पाकिस्तानमधील पंजाब प्रांतात असलेल्या मियांवली हवाई तळावर आज सकाली दहशतवादी हल्ला झाला. सशस्त्र आत्मघाती हल्लेखोर हवाई दलाच्या प्रशिक्षण तळात घुसत त्यांनी इंधन टॅकर आणि तीन विमानांना नष्ट केली. दरम्यान पाकिस्तानच्या सैन्याने भिंत ओलांडून आलेल्या ९ दहशतवाद्यांना ठार केलं आहे. (Latest News)
या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी तहरीक-ए- जिहाद पाकिस्तानने घेतलीय. ठार झालेले दहशतवाद्यांनी हवाई तळाच्या संरक्षण भिंतीला सिडी लावून ते आतमध्ये घुसले होते. जिओ न्यूजला पाकिस्तानी हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या सैनिकांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला. हवाई दलाच्या आत आणि आजूबाजूच्या परिसरात मोहीम राबवत ९ दहशतवाद्यांना ठार केलं. या हल्ल्यात एक इंधन टॅकर आणि तीन विमानांचं नुकसान झालंय. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
तहरीक-ए-जिहाद एक दहशतावादी संघटना आहे. ही एक घोस्ट संघटना आहे, कारण या दहशतवादी संघटनाविषयी अधिक माहिती कोणालाच नाहीये. याआधी तहरीक-ए-जिहादने चमन, बोलान, स्वातच्या परिसरात झालेल्या लकी मरूतमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय. तर काही माध्यमांच्या मते, या संघटनेचा काही हल्ल्यांमध्ये समावेश नव्हता, तरीही या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ल्यांची जबाबदारी घेतलीय.
बीबीसीच्या एका वृत्तानुसार, तहरीक-ए-जिहादला तहरीक-ए- तालिबान पाकिस्तानकडून पाठिंबा मिळतो. टीटीपीला ज्या दहशतावादी हल्ल्यांची जबाबदारी घ्यायची नसते त्या हल्ल्यांची जबाबदारी तहरीक-ए-जिहादवर ढकलली जाते. दरम्यान मागील २४ तासात दोन दहशतवादी हल्ले झालेत. याआधी शुक्रवारी रात्री ग्वादरमध्ये २ सैनिकी वाहनांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यात १४ सैनिकांचा मृत्यू झाला होता.
हल्ला झाला त्यावेळी पाकिस्तानी सैनिक पसनीकडून ओरमाराकडे जात होते. यानंतर या परिसरात दहशतवाद्यांची शोध घेतला जात आहे. याशिवाय शुक्रवारी खैबर पख्तुनवा येथील अनेक भागात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या आत्मघातकी दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं होते. दहशतवादी या परिसरात लपून बसल्याची माहिती पाकिस्तानच्या गृप्तहेरांनी दिली होती. या चकमकीत दोन दहशतावादी ठार झाले होते तर दोन जण जखमी झाले होते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.