कॉकरोच जनता पार्टी अन् सरकारमध्ये खलबतं, मध्यरात्री आणखी एक मोठी मागणी मान्य

Cjp Govt Talks Withdraw-Cases Neet Protesters: सीजेपी आणि केंद्र सरकारमध्ये मध्यरात्री झालेल्या बैठकीत मोठा निर्णय; आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची सरकारची हमी. लवकरच अधिकृत अधिसूचना जाहीर होणार.
CJP leaders after midnight meeting claim govt assurance on withdrawal of cases against NEET protesters
CJP leaders after midnight meeting claim govt assurance on withdrawal of cases against NEET protesterssaam tv
Published On

कॉकरोच जनता पार्टीने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी अखेर राजीनामा दिला. मात्र, आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांवरचे गुन्हे दाखल घेण्याची अट कॉकरोच जनता पार्टीने ठेवली होती. या संदर्भात मध्यरात्री 1 वाजता सौरव दास आणि सरकारच्या काही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत सरकारने आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची हमी सरकारने दिली आहे, या संदर्भात अधिकृत अधिसूचना मंगळवारी जाहीर केली जाईल असेही त्यांनी म्हटले आहे.

CJP leaders after midnight meeting claim govt assurance on withdrawal of cases against NEET protesters
भाजपचे भीष्म पितामह पंचतत्वात विलीन; राजकारणात शोककळा

सौरव दास यांनी व्हिडिओ पोस्ट करत सांगितले की, रात्री 1 वाजता आमची दिल्ली पोलिसांसोबत बैठक पार पडली. त्यांनी आम्हाला विचारले की कोणती अडचणी आहेत. आम्ही सरकारने दिलेल्या दिलेल्या आश्वासनांबाबत शंका व्यक्त केली. त्यांनी बिहार गृह विभागाची प्रेस नोट दाखवली, ज्यामध्ये ज्यामध्ये आंदोलनकर्त्यांवरील सर्व गुन्हे मागे घेण्याची आणि भविष्यात कोणतीही कारवाई न करण्याची हमी देण्यात आली आहे. आम्ही सुमारे दोन तास चर्चा केली आणि इतर राज्यांमध्येही अशी घोषणा कशी होऊ शकते यावर विचार झाला.

दास यांनी सांगितले की, सरकारने आम्हाला आश्वासन दिले आहे की मंगळवारपर्यंत सर्व अधिसूचना जारी होतील. आंदोलनकर्ते सुरक्षित राहतील आणि भविष्यातही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही. CJP च्या दुसऱ्या प्रवक्त्या रत्ना सिंह यांनीही याला दुजोरा दिला. त्या म्हणाल्या, ज्या ठिकाणी अजूनही केस दाखल होत असल्याची माहिती मिळेल, ती आम्हाला कळवा. आम्ही खात्रीशीर सांगतो की, कोणत्याही आंदोलनकर्त्यावर कारवाई होणार नाही.

CJP leaders after midnight meeting claim govt assurance on withdrawal of cases against NEET protesters
आंदोलक विद्यार्थ्यांवर AK-47नं गोळीबार, राहुल गांधी यांचा खळबळजनक दावा

नीट (NEET) पेपरफुटी आंदोलनादरम्यान CJP ने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या होत्या.

1. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा

2. सर्व आंदोलनकर्त्यांना कायदेशीर करू नये

3. आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी 1 कोटी रुपयांची मदत

यापैकी पहिली मागणी पूर्ण झाली असून धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. उर्वरित दोन मागण्यांवर सरकारने सहमती दर्शवली असली तरी अधिकृत घोषणा अद्याप बाकी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com