Mumbai Fort : पावसाळ्यात पहिल्यांदाच ट्रेक प्लान करताय? 'हे' आहेत मुंबईजवळील ५ सुरक्षित किल्ले

Shreya Maskar

पावसाळा

पावसाळ्यात तुम्ही ट्रेकिंगचा प्लान करत असाल तर मुंबईजवळ चढायला सोपे काही किल्ले आहेत. येथे तुम्ही ट्रेकिंग आणि पावसाचा आनंद घेऊ शकता.

rainy season | pinterest

कर्नाळा किल्ला

कर्नाळा किल्ला हा पनवेलमध्ये वसलेला आहे. मुंबईजवळील हे महत्त्वाचे ऐतिहासिक ठिकाण आहे. कर्नाळा किल्ला हा कर्नाळा पक्षी अभयारण्यात आहे. येथे जवळपास २ तासांचा जंगल ट्रेक करून जावा लागतो.

Karnala Fort | google

विसापूर किल्ला

लोणावळा येथे विसापूर किल्ला वसलेला आहे. विसापूरजवळ ट्रेकिंगसाठी कठीण असलेला लोहगड किल्ला आहे. तुम्ही वीकेंडला विसापूर किल्ल्याला भेट देऊ शकता.

Visapur Fort | google

राजमाची किल्ला

खंडाळा येथे राजमाची किल्ला आहे. राजमाची किल्ल्याला जाण्यासाठी कोंदिवडे गावामधून वाट आहे. येथून सह्याद्रीच्या हिरव्यागार पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते.

rajmachi fort | google

कोरीगड किल्ला

कोरीगड किल्ला विरारपासून १५० किमी अंतरावर वसलेला आहे. किल्ल्यावरील पठार विस्तीर्ण आहे. पावसाळ्यात येथे ट्रेकिंग सुरक्षित मानले जाते.

Korigarh Fort | google

आशेरीगड किल्ला

पालघर येथे आशेरीगड किल्ला वसलेला आहे. जंगलातून जाणारा हा मध्यम स्वरूपाचा ट्रेक एका विशाल आणि ऐतिहासिक पठारावर संपतो.

Asherigarh Fort | google

सोंडाई किल्ला

कर्जत येथे सोंडाई किल्ला आहे. याचा पायथा मोरबे धरणाजवळ आहे. हा १- २ तासांचा ट्रेक आहे.

Sondai Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : मराठ्यांच्या वैभवाची साक्ष देणारा चिपळूणजवळील किल्ला, प्रत्येक इतिहासप्रेमीने पाहावे असे 'हे' ठिकाण

Chiplun Fort | saam tv
येथे क्लिक करा...