J 35 Fighter Jet : भारताविरोधात चीनची पाकला मदत; तातडीने देणार 35 ए स्टील्थ फायटर जेट, काय आहेत वैशिष्ट्ये?

china help pakistan : भारतविरोधात पाकिस्तानला उघड पाठिंबा देणाऱ्या चीनने पाकसोबत फायटर जेटची मदत केलीय.. मात्र चायना माल असलेलं जे 35 ए स्टिल्थ जेटचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे? भारत या जेटचा सामना कसा करणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.....
 J 35 Fighter Jet
china help pakistansaam tv
Published On

पहलगाम हल्ल्यानंतर संपूर्ण जग भारतासोबत उभं असताना चीनने नीचपणे पाकिस्तानला समर्थन दिलं... एवढंच नाही तर चीनने पाकिस्तानला ड्रोन, हवाई संरक्षण यंत्रणा आणि फायटर जेट दिले... मात्र भारतानं त्याचा सफाया केला.. आता पुन्हा एकदा चीनने भारताविरोधात पाकिस्तानला मदत करण्याचा निर्णय घेतलाय.. चीन पाकिस्तानला जे 35 ए स्टील्थ फायटर जेट तातडीने देणार असल्याचं समोर आलंय... मात्र या फायटर जेटची वैशिष्ट्ये काय आहेत? पाहूयात...

 J 35 Fighter Jet
Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग; राजकारणातील दोन भाऊ एकत्र येणार, नवी आघाडी होणार?

जे 35 ए स्टेल्थ जेटचं वैशिष्ट्ये

स्टील्थ तंत्रज्ञान- रडार आणि हवाई क्षेपणास्त्र सिस्टीमला चकमा देऊ शकतं

ट्विन इंजिन डिजाईन- वेगासह हवेत आणि जमिनीवर मारा कऱण्याची क्षमता

आधुनिक एव्हिओनिक्स- शत्रूच्या रडार आणि सेन्सरची अचूक माहिती देऊ शकतं

शॉर्ट रेंज आणि लांब पल्ल्याचे मिसाईल वाहून नेण्याची क्षमता

 J 35 Fighter Jet
Maharashtra Politics : पवार-ठाकरेंनंतर आंबेडकरी एकत्र? रामदास आठवले आणि प्रकाश आंबेडकरांच मनोमिलन होणार? पाहा स्पेशल व्हिडिओ

खरंतर भारतानं जे एफ 17 आणि एच क्यू ही चीनी बनावटीची हवाई संरक्षण सिस्टीम उद्ध्वस्त केली... मात्र आता चीन नवीन जेट पाकिस्तानला जे 35 ए स्टेल्थ जेटची डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतलाय.. त्यामुळे पाकिस्तान आता आणखी कर्जात बुडणार हे निश्चित आहे.

 J 35 Fighter Jet
Thane News : ठाण्यात बिल्डरकडून नियम धाब्यावर, रहिवाशांच्या राखीव जमिनीवर डल्ला? काय आहे संपूर्ण प्रकरण? वाचा

तर दुसरीकडे चीन जरी पाकिस्तानला फायटर जेट देत असला तरी चायनीज बनावटीची क्वालिटी किती असते हे संपूर्ण जगाला माहितीय... त्यामुळं ऑपरेशन सिंदूरनंतर जसं पाकिस्तानचा चायना माल भारतानं नष्ट केला... तसाच आता या नव्या आव्हानालाही उत्तर देण्यास भारत सज्ज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com