अमेरिका- इराण बोलणी फिस्कटली आणि होर्मुझ पुन्हा कळीचा मुद्दा बनलं. इराणची पूर्णत: नाकेबंदी करण्यासाठी अमेरिकनं मोठा फौजफाटा तैनात केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट ऑपरेशन स्ट्रेट शील्ड लाँच केलं. युएसएस अब्राहमसह अमेरिकेने 15 युद्धनौका होर्मुझमध्ये तैनात केल्या आहेत. तसंच, त्रिपोली अॅम्फिबियस रेडी ग्रुपमधील तीन जहाज, अण्वस्त्रवाहू पाणबुड्यांसह 150 लढाऊ विमानही इथे तैनात करण्यात आलीयेत.
मात्र या नाकेबंदीने चीन चांगलचं चवताळला.चीननं होर्मुझ आमच्यासाठी खुली असल्याचं सांगत अमेरिकेच्या इशाऱ्याला धुडकावून लावल आणि आपली सागरी वाहतूक सुरूच ठेवली.होर्मुझमध्ये अमेरिकेनं इतका मोठा फौजफाटा तैनात करूनही चीननं आपलं तेलवाहू जहाज सुरक्षितरित्या बाहेर काढलंय.
अमेरिकेने लादलेल्या निर्बंधांनंतर आणि नौदलाची नाकेबंदी असूनही एका चीनी टँकरने होर्मुझ सामुद्रधुनीतून मार्ग काढल्याने जागतिक स्तरावर नव्या चिंतेला तोंड फुटलंय. शिपिंग डेटानुसार, ‘रिच स्टारी’ नावाचा टँकर होर्मुझमधून यशस्वीरित्या बाहेर पडला. शांघाय झुआनरुन शिपिंग कंपनीचा टँकर अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून सुरक्षित बाहेर पडला युएईच्या हमरिया बंदरातून सुमारे 2.5 लाख बॅरल मेथनॉल घेऊन हे जहाज चीनच्या दिशेनं रवाना झालंय.
आपली जहाजे सुरक्षित बाहेर काढून बलाढ्य अमेरिकेच्या वर्चस्वालाच एकप्रकारे चीननं थेट आव्हान दिलंय. इतकंच नाही तर इराणच्या प्रतिकाराला चीनचं पाठबळ असेल तर आगामी काळात अमेरिका-चीन यांच्यात संघर्ष उफाळून येऊ शकतो. तसंच, चीन उघडपणे भूमिका घेत नसलं तरी अमेरिका आता याला कसं प्रत्युत्तर देत याकडे जगाचं लक्ष लागलंय...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.