World's Richest Person : एलन मस्क पुन्हा एकदा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; जाणून घ्या किती वाढली संपत्ती?

Elon Musk: एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.
Elon Musk
Elon MuskSaam Tv
Published On: 

नवी दिल्ली : एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. ब्लुमबर्ग बिलिनेअर इंडेक्सच्या माहितीनुसार, १८७ अब्ज डॉलर इतक्या संपत्तीसोबत एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत होण्याचे व्यक्ती ठरले आहेत. (Latest Marathi News)

एलन मस्कची संपत्ती किती?

ताज्या आकडेवारीनुसार, एलन मस्क (Elon Musk) यांची एकूण संपत्ती १८७. १ अब्ज डॉलर इतकी झाली आहे. तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची संपत्ती १८५.३ इतकी होऊन ते दुसऱ्या स्थानवर घसरले आहेत.

Elon Musk
Bihar Marriage : 6 महिन्यात तरूणीची 3 लग्न, ग्रामस्थांनी जबरदस्ती बांधली लग्नगाठ; कारण वाचून धक्का बसेल

मस्क पहिल्या स्थानावर कसे पोहोचले?

गेल्या वर्षी श्रीमंताच्या यादीत एलन मस्क दुसऱ्या स्थानावर होते. मात्र, २०२३ मध्ये एलन मस्क यांना मोठा नफा झाल्याचे दिसून येत आहे. एलन यांना ऑटो कंपनीच्या शेअरमुळे फायदा झाल्याची माहिती समोर आली आहे. तर यावर्षी टेस्लाच्या स्टॉक्समध्ये ९० टक्के वाढ नोंद झाली आहे. तर एलन मस्क यांच्या संपत्ती ३६ टक्के अर्थात ५० अब्ज डॉलरने वाढ झाली आहे. त्यामुळे डिसेंबरच्या अखेरपर्यंत मस्क यांची संपत्ती १३७ अब्ज डॉलर इतकी झाली होती.

ट्विटरच्या खरेदीनंतर संपत्ती झाली होती घट

ऑक्टोबरमध्ये ४४ अब्ज डॉलर ट्विटर (Twitter) खरेदीनंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, कंपनीच्या महसुलात मोठी घट झाली. एलन यांनी संपत्तीत घट झाल्याचा दोष हा जाहिरातदारांवर दबाव आणणाऱ्या गटांना दिला होता.

Elon Musk
Viral News : धावत्या ट्रेनमध्ये तरुणीचं धक्कादायक कृत्य; VIDEO पाहून नेटकरी संतप्त

दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर कोण?

ब्लुमबर्ग बिलिनेअर इंडेक्सच्या माहितीनुसार, एलन मस्क यांच्या संपत्तीमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ६.९८ अब्ज डॉलर्स इतकी वाढ झाली . यामुळे एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. तर जगातील श्रीमंताच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड अर्नाल्ट तर तिसऱ्या क्रमांकावर जेफ बेझोस आहे. तर त्यांच्या खालोखाल बिल गेट्स आणि वॉरन बफेट आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com