Girl Smoking In Running Train : बस किंवा ट्रॅव्हल्सपेक्षा ट्रेनचा प्रवास अधिक सुखकर मानला जातो. ट्रेनमध्ये प्रवास करणे लोकांसाठी सोपे आणि सोयीस्कर आहे. परंतु यासोबतच प्रवाशांना अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, ट्रेनमध्ये कधीही विना तिकीट प्रवास न करणं. तसंच ज्वलनशील वस्तू अजिबात जवळ न बाळगणं. यासारख्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. (Latest Marathi News)
धुम्रपान करणं हे हानिकारकच आहे. सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करु नये, अशा प्रकारचे अनेक फलक आपण दररोज पाहत असतो. पण अनेकजण याच फलकांच्या शेजारी उघड्यावर सिगारेट पिताना दिसतात. त्यामुळे लोक प्रशासनाचे घालून दिलेल्या नियमांचे कसे उल्लंघन करत असतात.
मात्र, एसटी, विमान किंवा रेल्वेतून (Railway) प्रवास करताना अनेक लोक खबरदारी घेतात आणि ते प्रवासादरम्यान धुम्रपान करणं टाळतात. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी थेट धावत्या ट्रेनमध्येच प्रवाशांसमोर सिगारेट पिताना दिसत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. एका तरुणीला ट्रेनमध्ये सिगारेट पिताना पाहून नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. याच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद केला आहे. व्हिडीओ समोर येताच, या तरुणीवर रेल्वे प्रशासनाने कारवाई देखील केली आहे.
व्हिडीओ काय आहे?
२१ सेंकदाच्या या व्हिडीओत ट्रेनमधून प्रवासी प्रवास करताना दिसत आहे. काही प्रवासी आपल्या जागेवर बसले आहेत. काही प्रवाशांना जागा न मिळाल्याने ते खाली बसून किंवा उभे राहून प्रवास करीत आहेत.व्हिडीओत एक मुलगी गुलाबी कलरचे जॅकेट आणि चश्मा घालून ट्रेनच्या वॉशरूमजवळ उभी असलेली दिसत आहे.
ही निर्लज तरुणी थेट सिगारेट ओढत आहेत. सिगारेट ओढत असताना, ती तिच्या समोर असलेल्या दुसऱ्या एका तरुणीसोबत गप्पा मारत आहे. ट्रेनमधील एका प्रवाशाने हा संपूर्ण प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे. व्हायरल व्हिडीओ (Viral Video) @Parmanand kumar Saw या व्यक्तीने आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे.
इतकंच नाही तर व्हिडीओ केंद्रीय रेल्वे मंत्री @AshwiniVaishnaw यांना टॅग देखील करण्यात आला आहे. धावत्या ट्रेनमध्येच तरुणीला सिगारेट पिताना बघून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे कळू शकलेलं नाही. मात्र, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या तरुणीला थेट जेलची हवा खावी लागली आहे.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.