chhattisgarh encounter bijapur five naxals killed drg jawan martyred (File Photo)
chhattisgarh encounter bijapur five naxals killed drg jawan martyred (File Photo)Social Media

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

chhattisgarh encounter bijapur five naxals killed drg jawan martyred : छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. चकमकीत ५ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या कारवाईवेळी सुरक्षा दलाचा जवान शहीद झाला.
Published on
Summary
  • छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षल्यांविरोधात मोठी कारवाई

  • सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाला मोठं यश

  • ५ नक्षलवाद्यांचा खात्मा

  • डीआरजीचा एक जवान शहीद

छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दलांच्या नक्षलविरोधी मोहिमेला मोठं यश आलं आहे. सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईत ५ नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. नक्षलवाद्यांशी लढताना डीआरजीच्या एका जवानाला वीरमरण आलं. मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलाचं एक संयुक्त पथक पश्चिमेकडील बस्तर विभागातील जंगल परिसरात नक्षलविरोधी मोहिमेवर रवाना झाले होते. घनदाट जंगलात सकाळच्या सुमारास नक्षलवाद्यांकडून बेछूट गोळीबार सुरू झाला. त्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रत्युत्तर दिलं.

एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील पश्चिम बस्तर विभागाच्या जंगलात नक्षलवाद्यांच्या संशयित हालचाली दिसून आल्याची माहिती खबऱ्यांकडून मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकानं मोहीम आखली. त्यानुसार या जंगल परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं. जवानांकडून शोध सुरू असतानाच, नक्षलवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

रिपोर्टनुसार, दोन्ही बाजूने गोळीबार झाला. या चकमकीत आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले आहे. डीआरजीचा एक जवान यात शहीद झाला आहे. या चकमकीत आणखी एक जवान जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या मोहिमेत डीआरजी, स्पेशल टास्क फोर्स अर्थात राज्य पोलीस दलाचे दोन युनिट, कोब्रा (कमांडो बटालियन फॉर रेजोल्युट अॅक्शन - सीआरपीएफ एलीट युनिट) जवान देखील होते.

chhattisgarh encounter bijapur five naxals killed drg jawan martyred (File Photo)
Crime News : २४ वर्षांच्या तरुणीनं जाळं टाकलं, मुंबईचा बिल्डर अडकला; लॉजवर बोलावलं, आरेच्या जंगलात नेऊन...

आतापर्यंत पाच नक्षलवाद्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. यावर्षी आतापर्यंत छत्तीसगडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकींमध्ये २६८ नक्षलवादी मारले गेले आहेत. त्यातील २३९ नक्षलवादी बस्तर विभागातील आहेत. बस्तर विभागात बिजापूर आणि दंतेवाडासह सात जिल्हे येतात. गरियाबंद जिल्ह्यात २७ नक्षलवादी मारले गेले आहेत. दुर्ग विभागातील मोहला-मानपूर-अंबागढ चौकीत यावर्षी आतापर्यंत दोन नक्षलवादी मारले गेले आहेत.

chhattisgarh encounter bijapur five naxals killed drg jawan martyred (File Photo)
Criminal Encounter : आतापर्यंतचा सर्वात मोठा एन्काउंटर, ६४ गुन्हेगारांचा खात्मा, स्पेशल फोर्सची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com