ब्राझीलच्या रिओ दि जानेरो शहरात ६४ गुन्हेगार ठार
चकमकीत ४ जवान शहीद
‘रेड कमांड’ नावाच्या गुन्हेगारी संघटनेवर मोठी कारवाई
ड्रग्ज तस्करी आणि संघटित गुन्हेगारीविरुद्ध ब्राझील सरकारची सर्वात मोठी मोहिम
चकमकीच्या बातम्या भारतीयांसाठी काही नवीन नाहीत. उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये होणाऱ्या चकमकींबद्दल आपण नियमितपणे वाचतो. तथापि काल झालेली एक चकमक इतिहासातील सर्वात मोठ्या चकमकींपैकी एक ठरली आहे. ज्यामध्ये पोलिसांनी तब्बल ६४ गुन्हेगारांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईत काही जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यायला लागली आहे. मात्र ही घटना आपल्या भारतात नाही तर हजारो मैल दूर ब्राझीलमध्ये घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी ब्राझीलमधील रिओ दि जानेरोमध्ये संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली. या कारवाईत ब्राझीलने रौद्र रूप धारण करत ६४ गुन्हेगारांना ठार केले. या चकमकीत दुर्दैवाने ब्राझीलच्या ४ जवानांना चालू चकमकीत वीर मरण आले. ही कारवाई शहराच्या उत्तरेकडील भागात, विशेषतः अलेमाओ आणि पेन्हा कॉम्प्लेक्स फावेला भागात केंद्रित होती, जिथे कमांडो व्हर्मेल्हो (रेड कमांड) नावाची गुन्हेगारी संघटना प्रबळ आहे. रिओ दि जानेरोचे गव्हर्नर क्लॉडिओ कॅस्ट्रो यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पोलिसांनी या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. शिवाय ४२ रायफल देखील जप्त करण्यात आल्या आहेत.
कॅस्ट्रोने रिओ डी जानेरोच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. ब्राझील सरकारने सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले आहे की, कमांडो व्हर्मेल्होच्या प्रादेशिक विस्ताराला तोंड देण्यासाठी ही कारवाई एका वर्षाहून अधिक काळापासून सुरू होती. ज्यामध्ये २,५०० हून अधिक लष्करी आणि नागरी पोलिस अधिकारी सहभागी होते. कमांडो व्हर्मेल्हो ही ब्राझीलची सर्वात जुनी सक्रिय गुन्हेगारी संघटना आहे, ज्याचे नाव रेड कमांडच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, ही संघटना १९८५ पर्यंत चाललेल्या लष्करी हुकूमशाही काळात तुरुंगात स्थापन झालेल्या डाव्या विचारसरणीच्या कैद्यांची संघटना होती.
इनसाईट क्राइम थिंक टँकच्या मते, ही संघटना आता ड्रग्ज तस्करी आणि खंडणीमध्ये गुंतलेली एक मोठी आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी नेटवर्क बनली आहे. अलिकडच्या काळात, तिला राज्याच्या कारवाई आणि इतर गुन्हेगारी मिलिशियांसोबत वाढत्या हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. कारवाईदरम्यान परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण राहिली. दरम्यान ब्राझीलकडून झालेल्या या मोठ्या कारवाईचं कौतुक केलं जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.