YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला

Ulhasnagar Crime News : उल्हासनगरमध्ये युट्यूब चॅनेलवरील बातमीचा राग मनात धरून युट्यूबर आणि त्याच्या भावावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यात दोघे जखमी झाले असून, पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.
YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला
Ulhasnagar Crime NewsSaam Tv
Published On
Summary

उल्हासनगरमध्ये युट्यूबर संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने हल्ला

“डेली पेज” युट्यूब चॅनेलवरील बातमीचा बदला म्हणून हल्लेखोरांनी हल्ला केला

दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून मुख्य आरोपी फरार

पोलिसांवर कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह

अजय दुधाणे, उल्हासनगर

ऐन दिवाळीत कल्याण डोंबिवलीत अनेक गुन्हेगारीच्या घटना घडल्या. या वाढत्या गुन्हेगारीला वेळीच लगाम घालण्यासाठी कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी खाक्या दम द्यायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून शनिवारी रात्री गस्त वाढवण्यात आली. शिवाय या प्रकारचे गुन्हे टाळण्यासाठी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले. मात्र पोलिसांचे नियम धाब्यावर बसवत उल्हासनगरमध्ये युट्यूबरवर जीवघेणा हल्ला झाला आहे. हा हल्ला इतका तीव्र होता की या हल्ल्यात दोघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उल्हासनगर कॅम्प नंबर पाच परिसरातील तडीपार गुन्हेगार करण आणि अर्जुन यांच्या विरोधात डेली पेज ह्या युट्यूब चायनलवर मागील काही महिन्यांपूर्वी बातमी प्रसारित करण्यात आली होती. त्याचा राग करणं आणि अर्जुनच्या मनात खदखदत होता. या रागात या दोघांनी युट्यूबर संदीप सिंग आणि त्याच्या भावावर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात संदीप आणि त्याच्या भावाला तलवार लागल्याने दोघेही गंभीर जखमी झाले.

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला
Toranmal Hill Station : खानदेशचे सौंदर्य! तोरणमाळला दाट धुक्याची चादर,निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांची गर्दी

याप्रकारणी हिललाईन पोलिस ठाण्यात चौघांविरोधात जीवेठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह्या घटनेनंतर घटनास्थळावरुन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर मुख्य आरोपी करणं आणि अर्जुन दोघेही फरार झाले आहेत.

YouTuber Attack : करण - अर्जुनची शहरात दहशत, सोशल मीडियावर बातमी व्हायरल केल्यानं युट्यूबरवर प्राणघातक हल्ला
KDMC Action : मनसेचा धसका! केडीएमसी अ‍ॅक्शन मोडवर, स्टेशन परिसरातून सर्व अनधिकृत फेरीवाले हटवले

या घटनेनंतर उल्हासनगरमध्ये खळबळ उडाली आहे. नागरिकांनी सुरक्षेतेवर प्रश्नचिन्ह उभे केले असून दहशत माजवणाऱ्या या तडीपार गुंडांना तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान पोलीस या दोघांना अटक करणार का? आणि त्यांच्यावर कोणती कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com