
कार दरीत कोसळून जोडप्याचा मृत्यू.
कारचा नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळली.
पोलिसांनी अपघात असल्याचं सांगितलं.
ब्राझीलमधील वेंडा नोव्हा डो इमिदग्रांटे शहराजवळ एक भीषण अपघाताची घटना घडली. सुमारे १,३०० फूट उंच डोंगरावर चारचाकीमध्ये शरीरसंबंध ठेवत असताना एका जोडप्याचा अपघाती मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, कारचा हँडब्रेक न लावल्यानं ती नियंत्रण सुटून थेट दरीत कोसळली. पोलिसांनी सांगितले की, पुरूष आणि महिला दोघेही नग्न अवस्थेत होते. नंतर कार दरीत कोसळताना बाहेर फेकले गेले. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
ही घटना रात्री सुमारे १ वाजता घडली. कार दरीत कोसळल्यानंतर प्रचंड वेगाने पुरूष आणि महिला दोघेही कारमधून फेकले गेले असल्याची माहिती आहे. १३०० फूट डोंगरावर त्यांची कार पार्क केली होती. कारमध्ये दोघेही शारीरिक संबंध ठेवत असल्याची माहिती आहे. कारचे नियंत्रण सुटल्यानंतर थेट दरीत कोसळली. दोघेही खाली पडले. कार आणि मृत १०० मीटर अंतरावर आढळले.
मारकोन डा सिल्वा असं मृत पुरूषाचं नाव आहे. ते मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. तर, अड्रियाना माचाडो रिबेरो असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला आईच्या बेकरीत काम करीत होती. सहा महिन्यांपासून ते एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या रिलेशनशिपमध्ये भांडणं झाली नव्हती, गुण्यागोविंदाने दोघे राहत होते, अशी माहिती नातेवाईकांनी दिली.
अड्रियानाला दोन मुले असल्याची माहिती आहे. स्थानिक पोलीस अधिकारी अल्बर्टो रोक परेस यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या ठिकाणी कोणतीही हल्ल्याची चिन्हे आढळली नाहीत. कारच्या हँडब्रेकमुळे दरीत कोसळली. हा अपघात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.