पुण्यात फडणवीसांचा शरद पवारांना धक्का! बड्या नेत्याचा मुलगा भाजपच्या वाटेला? ५ स्टार हॉटेलमध्ये भेट अन्..

Pune politics heats up: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे चर्चेत आहेत. भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती.
Pune politics heats up
Pune politics heats upSaam
Published On
Summary
  • आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र चर्चेत.

  • पंचतारांकित हॉटेलमध्ये भाजपच्या बड्या नेत्यांची भटे.

  • पुण्यातील राजकारण तापलं.

येत्या काही महिन्यांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडतील. या निवडणुकांपूर्वी इनकमिंग तसेच आऊटगोईंग सुरू आहे. अशातच पुण्यातही राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का बसला असून, आमदाराचा मुलगा भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. या चर्चेमुळे पुण्यात राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

शरद पवार गटाच्या पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील आमदार बापूसाहेब पठारे यांचे पुत्र सुरेंद्र पठारे हे भाजपच्या संपर्कात असल्याची माहिती आहे. पुण्यातील विमान नगर परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरेंद्र पठारे यांनी भाजपच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा केली.

Pune politics heats up
शिकवणीच्या नावाखाली शिक्षकानेच विद्यार्थिनीची अब्रू लुटली, गर्भपाताच्या गोळ्यांचा ओव्हरडोज, मुलीचा मृत्यू

या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. या गुप्त बैठकीनंतर पुण्याचे भाजपचे पदाधिकारी हे इच्छुकांना, 'सुरेंद्र पठारे हे तुमचे पॅनल प्रमुख असतील, त्यामुळे तुम्ही त्यांच्या भेटी घ्या', असं खासगीमध्ये सांगत असल्याची माहिती आहे. पठारे यांनी नुकतंच पुण्यातील काही भाजपच्या नेत्यांची भेट घेतली. यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

Pune politics heats up
शूटआउट ॲट लोखंडवाला! पोलसांनी सिनेस्टाईल कुख्यात गुंडांच्या आवळल्या मुसक्या, एन्काउंटरमध्ये गँगस्टर माया जखमी

याबाबत सुरेंद्र पठारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'मी भाजप पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. याआधी १, ४ नंतर २२ तारखेला पक्षप्रवेश करेन, अशी माहिती समोर आली होती. पण जर पक्षप्रवेश होईल तर, मला घेऊनच होईल ना.. परंतु, माझ्या पक्षप्रवेशाची मलाच कल्पना नाही', असं एका मराठी वेबसाईटला माहिती देताना त्यांनी सांगितलं. एकीकडं आमदार मुलाच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू असताना, पठारे यांनी सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

Pune politics heats up
सूनेला अंधाऱ्या खोलीत डांबून ठेवलं, नंतर साप सोडला; महिला ओरडत राहिली पण.. सासरच्यांकडून छळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com