Shocking : रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारमध्ये शिक्षक विद्यार्थिनीसोबत नको त्या अवस्थेत, तरुणांनी व्हिडिओ काढला अन्...

Chhattisgarh Crime News : छत्तीसगडमध्ये शिक्षक आणि विद्यार्थिनीशी संबंधित आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. चौकशीअंती संबंधित शिक्षकाला बडतर्फ करण्यात आले असून प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे.
CHHATTISGARH TEACHER VIRAL VIDEO CONTROVERSY INAPPROPRIATE INCIDENT LEADS TO DISMISSAL
CHHATTISGARH TEACHER VIRAL VIDEO CONTROVERSY INAPPROPRIATE INCIDENT LEADS TO DISMISSALAI
Published On
Summary
  • छत्तीसगडमध्ये शिक्षकाचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

  • सुरेश कुमार जयस्वाल या शिक्षकावर कारवाई

  • चौकशी समितीने आरोपांची पुष्टी केली

  • शिक्षकाला पदावरून बडतर्फ करण्यात आले

छत्तीसगडमधून शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. एक नामांकित शाळेचा शिक्षक एका विद्यार्थिनीसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत आढळले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला. यानंतर या शिक्षकावर शाळा प्रशासनाने कठोर निर्णय घेत त्याला पदावरून हटवण्यात आले आहे. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. सुरेश कुमार जयस्वाल असे या शिक्षकाचं नाव असून स्वामी आत्मानंद उत्कृष्ट इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये कार्यरत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, २४ एप्रिलच्या रात्री जयस्वाल हा त्याच्या कारमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीसोबत आक्षेपार्ह अवस्थेत आढळले होते. बटौली परिसरातील काही स्थानिक तरुणांना संशयास्पद स्थितीत उभी असलेली गाडी दिसल्याने त्यांनी त्याठिकाणी जाऊन पाहणी केली. त्यावेळी गाडीत दोघेही आक्षेपार्ह अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेचा व्हिडिओ स्थानिक तरुणांनी मोबाईलमध्ये कैद केला आणि तो काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला.

CHHATTISGARH TEACHER VIRAL VIDEO CONTROVERSY INAPPROPRIATE INCIDENT LEADS TO DISMISSAL
Shocking : पुणे हादरलं! पतीने पत्नीच्या गुप्तांगावर ॲसिड टाकलं, १५ दिवस घरात कोंडून ठेवत केली मारहाण

ही बाब समोर आल्यानंतर बटौली येथील शांतीपारा परिसरातील रहिवासी आणि भाजप किसान मोर्चाचे राज्य कार्यकारिणी सदस्य अमित गुप्ता यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल केली. तक्रारीची गंभीर दखल घेत डीईओ यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यीय समितीची स्थापना केली. या समितीत बटौली आणि सीतापूर येथील अतिरिक्त जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांचा समावेश होता.

CHHATTISGARH TEACHER VIRAL VIDEO CONTROVERSY INAPPROPRIATE INCIDENT LEADS TO DISMISSAL
Shocking : भयंकर! अघोरी पूजेच्या नावाखाली जोडप्याची हत्या, मृतदेह मठ परिसरात लपवले; भोंदू बाबाच्या खुनी चेहऱ्याचं काळं सत्य समोर

समितीने सादर केलेल्या अहवालात व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती सुरेश कुमार जयस्वाल असल्याचे स्पष्ट झाले. तसेच, संबंधित वाहनही त्यांचेच असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यांच्यासोबत आढळलेली तरुणी ही त्यांची पत्नी नसल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी जयस्वालला बडतर्फ केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com