सिमकार्ड किंवा फोन नंबरशी संबंधित अनेक फसवणुकीच्या घटना घडत आहेत. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि दूरसंचार विभागाकडून वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब केला जातो. यावेळी डिजिटल फसवणुकीला आळा घालण्यासाठी सरकारने एक-दोन नव्हे तर लाखो मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत. डिजिटल पेमेंटची फसवणूक थांबवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले असून 70 लाख सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत.
आर्थिक सेवा सचिव विवेक जोशी यांनी ही माहिती दिली आहे. फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी, बँकांची यंत्रणा आणि इतर ऑनलाइन प्रक्रिया उत्तम करण्यासाठी सरकारने असे पाऊल उचलल्याचे ते म्हणाले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुढील बैठकीबाबतही माहिती देण्यात आली आहे. आर्थिक सायबर सुरक्षेशी संबंधित मुद्द्यावर पुढील बैठक जानेवारी 2024 मध्ये होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. (Latest Marathi News)
सायबर फसवणूक रोखण्यासाठी सरकारने मोबाईल क्रमांक ब्लॉक केल्याचे कारण दिले आहे. ज्या फोन नंबरद्वारे कोणतेही संशयास्पद व्यवहार झाले आहेत ते ब्लॉक करण्यात आले आहेत. अधिक माहिती देताना वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी म्हणाले की, आधार सक्षम पेमेंट सिस्टम (AEPS) फसवणुकीच्या समस्येकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
सरकारने का घेतला हा निर्णय?
संशयास्पद व्यवहार होत असलेले मोबाईल क्रमांक सरकारने ब्लॉक केले आहेत. युको बँकेत त्रुटी दिसून आली होती, त्यानंतर ही बैठक झाली. नोव्हेंबरच्या सुरुवातीला असे दिसून आले होते की, इन्स्टंट पेमेंट सेवेद्वारे (IMPS), UCO बँकेच्या खातेधारकांना 820 कोटी रुपयांच्या चुकीच्या क्रेडिटची सूचना देण्यात आली होती. अशा डिजिटल फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने संशयास्पद व्यवहार होत असलेले मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.