मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसवर CBI चा छापा! OSD वर गुन्हा दाखल, राजकारणात मोठा भूकंप

Bhagwant Mann latest news : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगड कॅम्प ऑफिसवर CBI ने छापा टाकला. OSD राजबीर घुमनसह सहा जणांविरोधात कथित भ्रष्टाचार प्रकरणात FIR दाखल करण्यात आली असून ८ ठिकाणी झडती घेण्यात आली.
Bhagwant Mann CBI raid
Bhagwant Mann CBI raid
Published On: 

Bhagwant Mann CBI raid : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या चंदीगड येथील 'कॅम्प ऑफिस'वर आणि त्यांचे ओएसडी राजबीर घुमन यांच्या घरावर CBI ने अचानक छापेमारी केली. भ्रष्टाचार आणि पदाचा गैरवापर केल्याच्या गंभीर आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे. सीबीआयने चंदीगड, मोहाली, गुरदासपूर, लुधियाना, पतियाळा, संगरूर आणि जालंधर येथे आरोपींशी संबंधित असलेल्या परिसरांची झडती घेतली. त्यांनी लॅपटॉप, मोबाईल फोन आणि आर्थिक कागदपत्रे जप्त केली.

मुख्यमंत्री कार्यालयातील महत्त्वाच्या पदावर असणारे ओएसडी राजबीर घुमन आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर अधिकाऱ्यांच्या बदल्या, प्रशासकीय मंजुऱ्या, शासकीय टेंडर आणि सरकारी धोरणांमध्ये बदल करण्यासाठी लाच घेतल्याचा गंभीर आरोप आहे.

ED ने या घोटाळ्याबाबत पंजाब पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पंजाब पोलिसांनी यावर योग्य कारवाई न केल्यामुळे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने कडक ताशेरे ओढत या प्रकरणाचा तपास थेट CBI कडे सोपवला होता. कोर्टाच्या आदेशानंतर CBI ने तातडीने गुन्हा दाखल करून पंजाब आणि चंदीगडमधील एकूण ८ ठिकाणी धाडी टाकल्या.

या छाप्यांनंतर मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजप आगामी पंजाब विधानसभा निवडणुकांची तयारी करत असून 'आप' सरकारची आणि माझी प्रतिमा मलिन करण्यासाठी ED आणि CBI चा वापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Bhagwant Mann CBI raid
भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

सीबीआयने मंगळवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांचे ओएसडी राजबीर घुमन आणि इतर ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्री मान यांच्या कॅम्प ऑफिसमध्ये सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सीबीआयकडून धाड टाकण्यात आली, त्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली. सीबीआय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच ऑफिसमध्ये घुमन कथितरित्या सहआरोपींना भेटत होता. सीबीआयच्या एका पथकाने संगरूरमधील घराचोन या घुमनच्या गावातील घरीही भेट दिली.

Bhagwant Mann CBI raid
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! परदेशातील डिग्री, पण भारतात बनावट नोंदणी; बुलढाण्यातील २ नामांकित डॉक्टरांना बेड्या

ईडीच्या अहवालावर आधारित न्यायालयाच्या आदेशानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला, असे सीबीआयने सांगितले. घुमन यांच्याशिवाय सीबीआयने नितीन गोहल, जितीन गोहल उर्फ ​​राजा, रोमी राजा महाजन, बीर देविंदर, आर. एस. नागरा आणि अज्ञात सरकारी अधिकारी व खासगी व्यक्ती यांच्या नावाचा समावेश एफआयआरमध्ये केला आहे. नितीन हा ‘कॅश-फॉर-ट्रान्सफर’ घोटाळ्यातील एक ‘मध्यस्थ’ आहे, त्याची घुमनपर्यंत पोहोच असल्याचा आरोप आहे. त्याचा भाऊ जितीन याला घुमन आणि डॉ. रोमी महाजन यांच्यामार्फत सीएमओपर्यंत पोहोच देण्यात आल्याचा आरोप आहे. डॉ. रोमी महाजन यांना ‘सहकारी’ म्हटले जाते, त्याने कथितपणे घुमनसोबत काम केले आणि नियुक्त्यांचे समन्वय साधण्यास मदत केली. देवेंदर हा ‘आप’चा युवा कार्यकर्ता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com