भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ

BJP MLA’s Bungalow Washed : गुजरातमधील भाजप आमदार बच्चू खाबड यांचा बंगला धुण्यासाठी २४ किलोमीटरवरून फायर ब्रिगेडची गाडी आल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वाद निर्माण झाला असून पालिकेने कुटुंबाकडून ₹२७०० शुल्क वसूल केले.
भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ
Published On: 

Bacchu Khabad, Gujarat BJP MLA : भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी बोलावल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. गुजरातमधील भाजप आमदार आणि माजी मंत्री बच्चू खाबड यांचा बंगला धुण्यासाठी थेट २४ किलोमीटर लांबून फायर ब्रिगेडची गाडी मागवण्यात आली होती. गुजरातमधील दाहोद जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. या प्रसंगाचा व्हिडीओ व्हायरल होताच गदारोळ उडाला आहे.

भाजप आमदाराची गाडी धुण्यासाठी फायर ब्रिगेडची गाडी बोलवण्यात आल्याच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून लोकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. व्हिडिओमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी पाण्याच्या जोरदार फवाऱ्याने आमदाराच्या घराच्या बाहेरील भिंती धुताना दिसत आहेत. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर गुजरातच्या राजकारणात मोठा गदारोळ झाला.

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ
फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! पोलीस, विद्यार्थी अन् कर्मचाऱ्यांसाठी एकाच वेळी ५ मोठे निर्णय; पाहा संपूर्ण यादी

प्रकरण अंगाशी येत असल्याचे पाहून नगरपालिका प्रशासनाने सावरासावर करण्या सुरूवात केली. गाडी पाठवताना ती कोणत्या कामासाठी मागवली आहे, याची आम्हाला कल्पना नव्हती, असे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, प्रकरण जास्त तापल्यानंतर नगरपालिकेने आमदार खाबड यांच्या कुटुंबाकडून २,७०० रुपये शुल्क वसूल केले आहे.

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ
शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर आणि मंत्री स्विमिंग पूलमध्ये; जरांगे पाटलांचा घणाघाती हल्ला; फडणवीसांनाही दिला इशारा

देवगड बरिया नगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेश कलाल म्हणाले, जेव्हा अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांना घराची बाहेरील भिंत धुण्यास सांगण्यात आले. त्यांनी काम सुरू केले आणि अग्निशमन प्रमुखांना बोलावले. अधिकाऱ्यांनी त्यांना थांबण्यास सांगितले. मलाही याबद्दल फोन आला, त्यानंतर मी त्यांना शुल्क आकारण्यास सांगितले.

भाजप आमदाराचा बंगला धुण्यासाठी २४ किमीवरून आली फायर ब्रिगेडची गाडी; व्हिडिओ व्हायरल होताच गदारोळ
२ बड्या नेत्याचं तिकिट कापले, आता मंत्रिमंडळातूनही पत्ता कट, मोदी कॅबिनेटमध्ये ४ नव्या मंत्र्यांची एन्ट्री होणार?

अग्निशमन अधिकारी मयूर चौहान म्हणाले, आम्हाला नगरपालिकेचे अध्यक्ष धर्मेश कलाल यांचा फोन आला आणि त्यांनी आगीची माहिती दिली. मी त्यांना विचारले की हा विशिष्ट फोन आहे की आगीची माहिती आहे. त्यांनी मला अग्निशमन दलाचे वाहन पाठवण्यास सांगितले. आमचे कर्मचारी तिथे पोहोचले, तेव्हा आमदारांच्या माणसांनी त्यांना घराच्या बाहेरील भिंती धुण्यास सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com