शेतकऱ्यांची पोरं रस्त्यावर आणि मंत्री स्विमिंग पूलमध्ये; जरांगे पाटलांचा घणाघाती हल्ला; फडणवीसांनाही दिला इशारा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा आणि प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांच्या मदतीची मागणी करत त्यांनी सरकारला इशारा दिला.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil
Published On: 

गरिबांची लेकरे आज आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर बसली आहेत. ज्या विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत, त्यांच्यासोबत आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. पुण्यात एमपीएससी (MPSC) विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

सरकारकडून फक्त दौरे आणि दिखावा

राज्य सरकारवर आणि मंत्र्यांवर टीका करताना जरांगे पाटील म्हणाले, सरकारने तरुणांना रस्त्यावर बसायची वेळ आणली आहे. सरकारचे मंत्री फक्त दौरे करत आहेत, स्विमिंग पूलमध्ये पोहतात आणि बांधावर जाऊन दुःखावर मीठ चोळतात. शेतात पाणी नाही, पोरांना नोकरी नाही आणि शिक्षक भरतीचा पत्ता नाही. दुष्काळात ५० किलोमीटरवर चारा छावण्या टाकल्या आहेत, मग जनावरांनी काय करायचे?

Manoj Jarange Patil
दिल्लीतील वातावरण तापले! राहुल गांधींचा गनिमी कावा, आयोगात जाण्यासाठी लढवली शक्कल, थेट आकाशवानी भवनात पोहोचले अन्...

शेतकरी कर्जमाफी आणि मदतीची मागणी

उद्योगपतींचे कर्ज माफ होते, मग ज्या शेतकऱ्यांमुळे तुम्ही खुर्चीवर बसलात त्यांचे कर्ज सरसकट का माफ करत नाही? असा सवाल त्यांनी केला. "शेतकऱ्यांचा पीक विमा थकला आहे. सरकारने प्रतिहेक्टरी १ लाख रुपयांची मदत करावी, अन्यथा पूर्ण महाराष्ट्र ओसाड पडलेला दिसेल," असा इशारा त्यांनी दिला. तसेच "दोन दिवस दोन घास नाही मिळाले तरी चालतील, पण कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या करू नका," असे कळकळीचे आवाहन त्यांनी केले.

Manoj Jarange Patil
वैद्यकीय क्षेत्रात खळबळ! परदेशातील डिग्री, पण भारतात बनावट नोंदणी; बुलढाण्यातील २ नामांकित डॉक्टरांना बेड्या

माझ्या जवळच्या लोकांना उचलले जात आहे

आपल्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या कारवाईवर बोलताना ते म्हणाले, मी फुटत नाही, म्हणून माझ्या आसपासच्या लोकांना धरले जात आहे. जे बोलत आहेत त्यांना उचलले जात आहे. गेल्या १५ दिवसांत माझ्या जवळचे कुठे गेले हे मला कळलेच नाही.

आरोपांवर बोलताना जरांगे म्हणाले की, गावातील लोकांबद्दल मी काही बोलणार नाही. आपण संयम बाळगायचा आहे, एक दिवस त्यांना पश्चात्ताप होईल. तरुणांनी महिलांविषयी बोलताना विचार करून बोलले पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com