Rahul Gandhi: राहुल गांधी यांना 2 वर्षांची होऊ शकते शिक्षा, पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल झाला गुन्हा; NCPCR अध्यक्षांचा दावा

FIR Against Rahul Gandhi: काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
FIR Against Rahul Gandhi
FIR Against Rahul GandhiSaam Tv
Published On

FIR Against Rahul Gandhi:

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार पीडितेची ओळख उघड केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याचप्रकारणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सने दिली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबाची ओळख उघड केल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी राहुल गांधींविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्सचे अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी सांगितले की, राहुल गांधी यांच्या विरोधात ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यात 6 महिन्यांपासून ते 2 वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

FIR Against Rahul Gandhi
Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; टेरर फंडिंग करण्याप्रकरणी उच्चशिक्षित व्यक्तीला अटक

ते म्हणाले की, "हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे त्याला लवकरात लवकर अटक करण्यात यावी. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणात आधीच विलंब केला आहे, त्यामुळे आणखी विलंब होता कामा नये." (Latest Marathi News)

याप्रकरणी सुनावणी करणाऱ्या खंडपीठाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने सामाजिक कार्यकर्ते मकरंद सुरेश म्हाडलेकर यांनी दाखल केलेली याचिका निकाली काढली. राहुल गांधी यांनी कार्यवाहक सरन्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले की, त्यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून संबंधित पोस्ट काढून टाकली आहे. राहुल गांधी यांनी राजकीय फायदा घेण्यासाठी ही पोस्ट केल्याचा युक्तिवाद म्हाडलेकर यांनी याचिकेत केला होता.

FIR Against Rahul Gandhi
Ram Mandir: 'सध्या रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ नका', पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आवाहन

पोलिसांचा एफआयआरनुसार, पोलिसांनी न्यायालयाला याचिका निकाली काढण्याची विनंती केली. पोलिसांनी सांगितले की, मुलीचा मृत्यू विजेच्या धक्क्याने झाला असून याप्रकरणी बलात्कार आणि खूनाचा कोणताही पुरावा नाही. दरम्यान, सप्टेंबर 2021 मध्ये पॉक्सो कायदा आणि भारतीय दंड संहिताच्या (IPC) कलम 23 अंतर्गत राहुलगांधींविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com