Ram Mandir: 'सध्या रामलल्लाच्या दर्शनासाठी अयोध्येला जाऊ नका', पंतप्रधान मोदींचे मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना आवाहन

PM Modi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना अयोध्येतील राम मंदिराला सध्या भेट देण्यासाठी जाऊ नका, असा सल्ला दिला आहे.
PM Modi Cabinet Meeting
PM Modi Cabinet MeetingSaam Tv
Published On

PM Modi Cabinet Meeting:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी आपल्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांना अयोध्येतील राम मंदिराला सध्या भेट देण्यासाठी जाऊ नका, असा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट मंत्र्यांची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेची गैरसोय टाळण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्येमध्ये जाण्याचं नियोजन करावं.

वृत्तसंस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी शहरात व्हीव्हीआयपी आणि व्हीआयपी दौऱ्यांमुळे भाविकांची प्रचंड गैरसोय होत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.   (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

PM Modi Cabinet Meeting
Mamata Banerjee Accident: ममता बॅनर्जींच्या कारचा अपघात, डोक्याला झाली दुखापत; VIDEO

एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, पंतप्रधान मोदींनी केंद्रीय मंत्र्यांना मार्चमध्ये अयोध्या दौऱ्याचे नियोजन करावे, अशी सूचना केली. केंद्रीय मंत्र्यांनी मार्चमध्ये अयोध्येला जाण्याचे नियोजन करावे किंवा कार्यक्रम पुढे ढकलावा, अशी सूचना त्यांनी केली.

दरम्यान, 22 जानेवारी रोजी श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर मंगळवारी राम मंदिराचे दरवाजे भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भगवान श्रीरामाच्या दर्शनासाठी लोकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे. प्राणप्रतिष्ठेनंतर मंगळवारी पाच लाखांहून अधिक भाविकांनी श्रीरामांचे दर्शन घेतले आणि बुधवारीही मोठी गर्दी पाहायला मिळाली.

PM Modi Cabinet Meeting
Nashik Crime: नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; टेरर फंडिंग करण्याप्रकरणी उच्चशिक्षित व्यक्तीला अटक

एएनआयशी बोलताना रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF) डेप्युटी कमांडंट अरुण कुमार तिवारी यांनी बुधवारी सांगितले की, आम्ही भाविकांची गैरसोय होणार नाही याची खात्री करू. मंदिराच्या आत आणि बाहेर सुमारे एक हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. पुढील काही दिवस येथे अशाच पद्धतीची सुरक्षा व्यवस्था राहणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com