पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कारचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. वर्धमानहून एका कार्यक्रमातून परतत असताना हा अपघात झाला. दरम्यान, अचानक गाडीला ब्रेक लागल्याने ममता यांच्या कपाळावर जखम झाली आहे.
मात्र या अपघाताबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री ममता यांची गाडी भरधाव वेगाने जात होती. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
इतक्यात वाटेत एक उंच जागा आली. त्यामुळे चालकाने वेगाने ब्रेक लावला. अचानक ब्रेक लागल्याने कारमध्ये बसलेल्या लोकांचे संतुलन बिघडले, त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्या कपाळावर जखम झाली, असं सांगण्यात येत आहे. (Latest Marathi News)
ममता बॅनर्जी यांची दुखापत किती गंभीर आहे, याबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली. मात्र कपाळावर किरकोळ जखम असल्याचे बोलले जात आहे. वर्धमानमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक आटोपून ममता बॅनर्जी या कोलकाता येथे परतत होत्या. यादरम्यान त्यांच्या कारला वाटेत अपघात झाला. मात्र दुखापत गंभीर नसल्याने ममता बॅनर्जी यांच्या कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ममता बॅनर्जी एका सार्वजनिक सेवा वितरण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वर्धमान जिल्ह्यात गेल्या होत्या. आधी त्या येथून हेलिकॉप्टरने प्रवास करणार होत्या. मात्र खराब हवामानामुळे ते रद्द करण्यात आलं. अशातच त्यांना रस्त्याने कारने कोलकात्याला जावे लागले. यादरम्यान त्यांच्या कारला अपघात झाला आणि ममता बॅनर्जी या जखमी झाल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.