Pune News: पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याची कमाल, हवामानाचा अंदाज सांगणारा बनवला ॲप

Weather App: पलाश वाघ याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही गाव, शहर किंवा देशाच्या हवामानाचा अंदाज घेण्यास मदत होईल.
Palash Wagh
Palash Wagh Saam Tv
Published On

Pune News:

राज्यात सतत बदलत असलेल्या हवामानामुळे तसेच, वाढत्या प्रदूषणामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सरकारकडून यावर अनेक उपाययोजना केल्या जात असल्या तरी परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. याला अपवाद ठरला आहे पुण्यातील द अकॅडमी स्कूलचा (TAS) १३ वर्षीय विद्यार्थी पलाश वाघ.

हा विद्यार्थी इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. पलाश याने हवामानाचा अंदाज घेणारा ॲप तयार केला आहे. या ॲपद्वारे वापरकर्त्यांना कोणत्याही गाव, शहर किंवा देशाच्या हवामानाचा अंदाज घेण्यास मदत होईल. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Palash Wagh
Gold-Silver Price Today (24 Jan 2024) : लगीनसराईत सोनं खरेदीची सुवर्णसंधी, सोन्याच्या दरात आज घसरण; चेक करा नवे दर

विद्यार्थी पलाश वाघ म्हणाला की, “इतरांपेक्षा मला काहीतरी वेगळं करायचं आहे. माझे आवडते विषय भूगोल आणि संगणक आहे. या दोन विषयांचा आधार घेऊन मी कोडिंग करण्याचा प्रयत्न केला. हे ॲप जावा स्क्रिप्ट आणि एचटीएमएल वापरून तयार केले आहे. वापरकर्ता इंटरफेस सीएसएसने केला आहे.'' (Latest Marathi News)

तो म्हणाला.''हे ॲप ॲपप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस (API) नावाच्या सॉफ्टवेअरशी जोडले गेले आहे. जे उपकरणाच्या स्थानानुसार रिअल-टाइम हवामान दर्शवण्यास मदत करते. हे ॲप परिसरातील वाऱ्याचा वेग आणि आर्द्रता देखील दर्शवते."

Palash Wagh
LinkedIn Job Report: मुंबईतील ८७ टक्के प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नोकरी बदलण्याचा करत आहेत विचार: अहवाल

पलाश वाघ या विद्यार्थ्याने तयार केलेल्या या ॲपला टास व्यावसायिकरित्या समर्थन देण्यासाठी आणि ते अँड्रॉइड तसेच आयओएस सॉफ्टवेअरवर ॲप स्टोअरवर लॉन्च करण्याची योजना आखत आहे. शाळेमध्ये पलाशला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून कौतुकाची थाप मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com