LinkedIn Job Report: मुंबईतील ८७ टक्के प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नोकरी बदलण्याचा करत आहेत विचार: अहवाल

Mumbai News: एक नवीन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुंबईतील ८७ टक्के प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत.
LinkedIn Job Report
LinkedIn Job ReportSaam Tv
Published On

LinkedIn Job Report:

एक नवीन अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुंबईतील ८७ टक्के प्रोफेशनल्‍स २०२४ मध्‍ये नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत. लिंक्‍डइनच्‍या नवीन संशोधनामधून निदर्शनास आले आहे की, मुंबईतील १० पैकी जवळपास ९ (८७ टक्‍के) प्रोफेक्‍शनल्‍स २०२४ मध्‍ये नवीन नोकरी बदलण्याचा विचार करत आहेत.

AI मुळे कौशल्‍य परिवर्तनाला गती मिळत असताना लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, भारतात रोजगारांसाठी आवश्‍यक कौशल्‍यांमध्‍ये २०१५ पासून ३० टक्‍क्‍यांनी बदल झाला आहे. २०३० पर्यंत या कौशल्‍यांमध्‍ये जागतिक स्‍तरावर ६५ टक्‍क्‍यांनी बदल होण्‍याची अपेक्षा आहे. या परिवर्तनादरम्‍यान नोकरी शोधणे आव्‍हानात्‍मक ठरू शकते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

LinkedIn Job Report
Honda NX500 भारतात लॉन्च, मिळेल पॉवरफुल इंजिन; Kawasaki Versys 650 शी करेल स्पर्धा

इतरांपेक्षा वरचढ ठरण्‍यासाठी शहरातील ७९ टक्‍के प्रोफेशनल्‍स त्‍यांच्‍या नोकरी शोधामध्‍ये यशस्‍वी होण्‍याकरिता नवीन मार्गांचा प्रयत्‍न करत आहेत. ८६ टक्‍के प्रोफेशनल्‍स लिंक्‍डइनवर अधिक कन्‍टेन्‍ट पोस्‍ट करत वैयक्तिक ब्रॅण्डिंगला प्राधान्‍य देत आहेत. तर ९० टक्‍के प्रोफेशनल्‍स नवीन कौशल्‍ये संपादित करण्‍यासाठी ऑनलाइन कोर्सेस, लर्निंगवर अधिक वेळ व्‍यतित करत आहेत. ते एआयचा वापर करण्‍यास देखील उत्‍सुक आहेत. जेथे ८३ टक्‍के प्रोफेशनल्‍स म्‍हणतात की, त्‍यामुळे त्‍यांना अधिक कार्यक्षमपणे व उत्‍पादकतेसह नोकरी शोधण्‍यास मदत होऊ शकते.  (Latest Marathi News)

प्रोफेशनल्‍सला योग्‍य मार्गदर्शन करण्‍यासाठी लिंक्‍डइनने मुंबईतील जॉब्‍स ऑन द राइजची यादी सादर केली आहे:

  • क्‍लोजिंग मॅनेजर

  • क्‍लायण्‍ट अॅडवायजर

  • सस्‍टेनेबिलिटी मॅनेजर

  • मेडिकल टेक्निशियन

  • सेल्‍स डेव्‍हलपमेंट रिप्रीझेन्‍टेटिव्‍ह

  • सोर्सिंग मॅनेजर

  • रिस्‍क मॅनेजमेंट कन्‍सल्‍टण्‍ट

  • फायनान्शियल प्‍लानिंग अॅनालिस्‍ट

  • ग्रोथ मॅनेजर

  • इन्‍व्‍हेस्‍टमेंट बँकर

LinkedIn Job Report
IRCTC Ayodhya: श्री रामजन्मभूमी आणि 3 ज्योतिर्लिंगांचे स्वस्तात होणार दर्शन, जाणून घ्या IRCTC टूर पॅकेजची संपूर्ण माहिती

या वर्षात भारतातील ९५ टक्‍के रिक्रूटर्स नवीन टॅलेंटचे स्‍वागत करण्‍याचे नियोजन करत असताना लिंक्‍डइनची त्‍यांना योग्‍य उमेदवार शोधण्‍यास मदत करण्‍याची आणि त्‍यांच्‍या कर्मचारीवर्गाला भावी कौशल्‍यांसह सुसज्‍ज करण्‍याची इच्‍छा आहे. यासंदर्भात लिंक्‍डइनने नवीन जनरेटिव्‍ह एआय टूल्‍सचा प्रयोग केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com