Honda Motorcycle & Scooter India ने भारतीय बाजारपेठेत नवीन बाईक लॉन्च केली आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच कंपनीने भारतात NX500 अॅडव्हेंचर टूरर बाईक लॉन्च केली आहे. जी थेट Kawasaki Versys 650 शी स्पर्धा करेल.
होंडाच्या लाइनअपमधील CB500X ची जागा घेण्यासाठी ही बाईक पूर्णपणे तयार आहे. बाजारात ही बाईक Kawasaki Versys 650 शी स्पर्धा करेल. या नव्याने लॉन्च झालेल्या बाईकच्या फीचर्स आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ... (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
Honda NX500 ला CB500X सारखेच इंजिन देण्यात आले आहेत. जे लिक्विड-कूल्ड 471 cc पॅरलल-ट्विन इंजिन आहे. बाईक 4-स्ट्रोक DOHC डिझाइनसह 8,600 rpm वर 46.5 bhp चा पॉवर आउटपुट आणि 6,500 rpm वर 43 Nm चा पीक टॉर्क देते. (Latest Marathi News)
NX500 चे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कलर पर्यायांबद्दल बोलायचे झाले तर बाईक तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल: ग्रँड प्रिक्स रेड, मॅट गनपावडर ब्लॅक मेटॅलिक आणि पर्ल होरायझन व्हाइट.
NX500 मध्ये 5-इंचाची पूर्ण-रंगीत TFT स्क्रीन आहे. ही बाईक होंडाच्या ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टमसह सुसज्ज आहे. ज्याला होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल म्हणतात. याशिवाय यात ऑल-एलईडी लाइटिंग आणि इमर्जन्सी स्टॉप सिग्नल फीचर्स देखील आहे.
जर तुम्ही Honda NX500 ची Kawasaki Versys 650 शी तुलना केली, तर Kawasaki मध्ये Honda पेक्षा जास्त पॉवर मिळते. कारण Versys 650 ला 649 cc चे पॉवर इंजिन मिळत आहे. दोन्ही बाईक लिक्विड कूलिंगने सुसज्ज आहेत. कावासाकीमध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.