सध्या लग्नाचा सीझन सुरु झाला आहे. त्यामुळे सगळीकडे सोने चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे तुम्हाला सध्याचे सोने चांदीचे भाव माहित असणे गरजेचे आहे. आज मुंबईच्या सराफा बाजारात 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 57,750 रुपये आणि 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 63,000 रुपये आहे तर चांदी (Silver) 75,300 रुपये किलो दराने विकली जात आहे.
आज देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याच्या (Gold) किमतीत वाढ झाली आहे, सोन्याच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे, जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करत असाल तर खरेदी करण्याचे त्याचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे आहे. जाणून घ्या तुमच्या शहरातील सोने चांदीचे भाव.
सोने चांदीच्या वाढत्या भावाबद्दल सराफा व्यापारी आणि इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनचे सदस्य मनीष शर्मा यांनी सांगितले की, सोने आणि चांदीच्या किमतीत बदल झालेला दिसतोय. चांदीच्या प्रतिकिलोच्या दरात आज 300 रुपयांचा बदल झाला आहे. आज चांदी 75,300 हजार रुपये किलो दराने विकली जाणार आहे, तर काल (मंगळवार) सायंकाळपर्यंत चांदी 75,000 हजार रुपये दराने विकली जात होती.
मनीष शर्मा यांनी सांगितले की, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. काल संध्याकाळी 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 57,800 रुपयांना विकले गेले. आजही त्याची किंमत 57,750 रुपये निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच किंमतीत 50 रुपयांची घट झाली आहे. त्याच वेळी, मंगळवारी लोकांनी 24 कॅरेट सोने 63,050 रुपये प्रति 10 ग्रॅम या दराने खरेदी केले. आज त्याची किंमत 63,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच किंमती कमी झाले आहे.
सोने खरेदी करताना या गोष्टी लक्षात ठेवा -
जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करत असाल तर त्याच्या गुणवत्तेकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हॉलमार्क पाहूनच दागिने खरेदी करा. सर्व कॅरेटचे हॉल मार्क नंबर वेगवेगळे असतात, ते पाहिल्यानंतर आणि समजून घेतल्यानंतर तुम्ही कोणते सोने खरेदी करावे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.