पौष महिना सुरु झाला की, सोन्य-चांदीच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळते. त्यामुळे खरेदीदारांचा कल सोने खरेदीकडे अधिक असतो. अशातच सलग चौथ्या दिवशी सोन्याच्या भावात घसरण झालेली पाहायला मिळाली.
मागील वर्षात सोन्याने उच्चांकाची पातळी ओलांडली होती तर नवीन वर्षात सोन्याचा भाव हा ७२ हजारांचा टप्पा गाठू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सोन्याच्या (Gold) किमतीत जागतिक पातळीवर वाढ होताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदी 2,024 डॉलर प्रति औंस आणि 22.70 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करताना दिसून आले. परंतु, मागच्या काही दिवसांपासून सोन्याच्या भावात घसरण होताना सतत दिसत आहे. जाणून घेऊया आजचे दर
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ५,७५५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या भावात ३०० रुपयांनी (Price) घसरण झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६२,७७० रुपये मोजावे लागतील. २४ कॅरेटसाठी ३३० रुपये जास्तीचे मोजावे लागतील.
आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७५,५०० रुपये मोजावे लागतील. आज चांदीच्या किमतीत प्रति किलोत ४०० रुपयांनी घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today In Marathi)
1. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (Gold Rate Today)
मुंबई- ६२,९५० रुपये
पुणे - ६२,९५० रुपये
नागपूर - ६२,९५० रुपये
नाशिक - ६२,९८० रुपये
ठाणे - ६२,९५० रुपये
अमरावती - ६२,९५० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.