

दिवाळीआधी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार
एल. मुरुगन यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिला
मोदी मंत्रिमंडळात पाच नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार होण्याच्या चर्चांना उधाण
केंद्रामध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी मंगळवारी पीएम मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळ आणि राज्यसभा या दोन्ही पदांचा तडकाफडकी राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळामध्ये मोठ्या फरबदलांच्या चर्चांना उधाण आले आहे.
एल. मुरुगन यांनी पंतप्रधानांना ५ पानी पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे त्यांनी पंतप्रधानांना आपल्या मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त करून राज्यसभेचा राजीनामा देण्याची परवानगी देण्याबाबत विनंती केली. राज्यसंस्थेला बळकट करण्यासाठी राज्यात परतण्याची इच्छा त्यांनी या पत्रातून व्यक्त केली. २०२९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये भाजपला मजबूत करण्यासाठी संघटनात्मक कामाला पूर्णपणे वाहून घेण्याची इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली.
एल. मुरुगन सप्टेंबर २०२१ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत आणि एप्रिल २०२४ मध्ये मध्य प्रदेशमधून राज्यसभेवर पुन्हा निवडून आले. त्यांचा कार्यकाळ एप्रिल २०३० मध्ये संपेल. मुरुगन यांच्या राजीनाम्यामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी एक जागा रिक्त होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आधीच अनेक मंत्रिपदे रिक्त आहेत. त्यासोबतच काही राज्यसभा सदस्यांना दुसरा कार्यकाळ न मिळाल्याने मंत्रिमंडळात आणखी जागा रिक्त होतील. यामुळे या महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार किंवा फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण भाजप नेतृत्वाकडून याबाबत अधिकृत माहिती समोर आली नाही. या सर्व घडामोडीदरम्यान येत्या १५ दिवसांत म्हणजे दिवाळीआधी केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे.
एल. मुरुगन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले राजीनामा पत्र शेअर केले आहे. पंतप्रधान मोदींना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेची आणि तामिळनाडूची सेवा करणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. मला राज्यमंत्री पदावरून कार्यमुक्त करावे आणि राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देण्याची परवानगी द्यावी जेणेकरून मी तामिळनाडूमध्ये पक्ष मजबूत करण्यासाठी पूर्ण वेळ देऊ शकेल.
त्यांनी पत्रात असे देखील लिहिले आहे की, 'गेली ५ वर्षे तुमच्या सरकारमध्ये सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी अत्यंत कृतज्ञता व्यक्त करतो. एका रोजंदारी मजुराच्या मुलावर तुम्ही जो विश्वास ठेवला तो माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान राहील. आता माझ्या लोकांमध्ये आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अथकपणे काम करून त्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद मागतो.'
दरम्यान, जॉर्ज कुरियन यांनी यापूर्वीच खासदारकीचा राजीनामा दिला होता. पक्षाचे माजी राज्यसभा खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनीही जुलैमध्ये राजीनामा दिला. काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपने केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांना उत्तर प्रदेशातून पुन्हा उमेदवारी दिली नाही. मात्र ते केंद्रीय मंत्रिमंडळात कायम आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.