Jagdeep Dhankhar : ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन; राज्यसभेचे सभापती धनखड यांचा खासदाराला इशारा

Jagdeep Dhankhar News : राज्यसभा सदनातील विरोधी पक्षातील काही सदस्यांच्या वर्तवणुकीमुळे उपराष्ट्रपती धनखड भडकले. ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन, असं एका खासदारावर भडकले.
Jagdeep Dhankhar : ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन; राज्यसभापती धनखड यांचा खासदाराला सज्जड इशारा
Jagdeep DhankharSaam Tv
Published On

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाच्या सामन्याआधी भारती महिला कुस्तीपटू विनेश फोगाटला अपात्र केल्याच्या मुद्द्यावरून राज्यसभेत चर्चेची मागणी करण्यात आली. मात्र, उपराष्ट्रपती जगदीप यांनी खासदारांची मागणी फेटाळली. त्यानंतर विरोधकांनी गुरुवारी सदनातून बाहेर पडले. यावेळी विरोधकांमधील काही सदस्यांच्या वर्तवणुकीमुळे राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड भडकले.

राज्यसभा सदनात धनखड यांनी महत्वाचे विषय पटलावर मांडण्यास सांगितले. त्यानंतर शून्य प्रहर सुरु झाल्यानंतर भाजपचे अजित गोपचडे यांनी त्यांचा मुद्दा मांडला. त्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि काही विरोधकांनी विनेश फोगाटचा अपात्र ठरवण्याचा मुद्द्यावर चर्चा करण्याची मागणी करू लागले. यावेळी गोपचडे त्यांचा मुद्दा मांडत होते.

यावेळी तृणमूलचे के डेरेक ओब्रायन काही बोलताना दिसले. यावेळी सभापतींना सदस्यांच्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर सदनात गोंधळ आणखी वाढला. त्यानंतर विरोधी पक्षातील सदस्यांनी विनेश फोगाटच्या समर्थनात घोषणाबाजी केली. त्यानंतर सभापतींनी विरोधी पक्षाकडून मल्लिकार्जुन खरगे यांना बोलण्याची संधी दिली. कालच आम्ही मुद्दा उचचला आहे. हा महत्वाचा मुद्दा असल्याचे खरगे यांनी सांगितले.

Jagdeep Dhankhar : ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन; राज्यसभापती धनखड यांचा खासदाराला सज्जड इशारा
Mumbai News: सेंट जॉर्ज रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा उपचाराअभावी मृत्यू, नातेवाईकांचा राडा, राहुल नार्वेकरांकडून २ डॉक्टरांचे निलंबन

मल्लिकार्जुन खरगे बोलत असताना अचानक सभापती धनखड यांनी त्यांना कोणता मुद्द्यांवर बोलू इच्छिता असे विचारले. त्यानंतर फोगाट यांचा मुद्द्यावर बोलू इच्छित असल्याचे सांगितले. तुम्ही या संदर्भातील कोणत्या मुद्द्यावर बोलू इच्छित आहात? असा सवाल धनखड यांनी केला. त्यानंतर चर्चा करा, या मागे कोण आहे? फक्त १० ग्रॅम वजनामुळे...कसं शक्य आहे? असा सवाल खरगे यांनी केला.

Jagdeep Dhankhar : ओरडण्याची हिंमत कशी झाली? पुढच्यावेळी बाहेरचा रस्ता दाखवेन; राज्यसभापती धनखड यांचा खासदाराला सज्जड इशारा
Maharashtra Politics: विधानसभेसाठी अजित पवारांचे मेगा प्लॅनिंग! आजपासून जनसन्मान यात्रेला सुरूवात; महाराष्ट्र पिंजून काढणार

सभापती धनखड यांनी खरगे यांना रोखलं. त्यानंतर धनखड पुढे म्हणाले, 'तुम्हाला सदनाचा वापर यासाठी करू देणार नाही. तुम्ही नियमांचं पालन करा. यावेळी विरोधकांनी सदनात गोंधळ घातला. यावेळी आवाज करणाऱ्या खासदार डेरेक यांना धनखड यांनी म्हटलं की, 'सदनातील तुमची वर्तुवणूक योग्य नाही. तुम्ही आसनावर ओरडत आहात. याचा निषेध करतो. पुढच्यावेळी घरचा रस्ता दाखवेल. तुमची आसनावर बसून ओरडण्याची हिंम्मत कशी झाली? असाही सवाल त्यांनी केला. यावेळी विरोधी पक्षातील खासदारांनी घोषणाबाजी करत सदनाबाहेर पडले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com