RSS राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था, उपराष्ट्रपती धनखड यांचं वक्तव्य; राज्यसभेत गदारोळ; पाहा VIDEO

Rajya Sabha Monsoon Session 2024: राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी आरएसएसवर टिप्पणी करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान ते म्हणाले की, ''ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था असून संस्थेशी संबंधित लोक नि:स्वार्थपणे काम करतात.''
RSS राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था, उपराष्ट्रपती धनखड यांचं वक्तव्य; राज्यसभेत गदारोळ; पाहा VIDEO
Jagdeep DhankharSaam Tv
Published On

आरएसएसवरून आज राज्यसभात मोठा गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी बुधवारी आरएसएसवर टिप्पणी करण्यावर तीव्र आक्षेप व्यक्त केला. राज्यसभेच्या कामकाजादरम्यान ते म्हणाले की, ''ही राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था असून संस्थेशी संबंधित लोक नि:स्वार्थपणे काम करतात. देशाच्या कामात गुंतलेल्या संस्थेवर टीका करणे चुकीचे असून देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा त्यांना अधिकार आहे.''

धनखड यांनी असं वक्तव्य केल्यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. या गदारोळानंतर बसपा आणि बीजेडीसह विरोधी पक्षांनी सभात्याग केला.

RSS राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था, उपराष्ट्रपती धनखड यांचं वक्तव्य; राज्यसभेत गदारोळ; पाहा VIDEO
Konkan ST Bus: होय महाराजा! गणपतीसाठी कोकणात एसटीच्या ज्यादा ४३०० बस धावणार

राज्यसभेत नेमकं काय घडलं?

आज समाजवादी पक्षाचे खासदार रामजी सुमन यांनी एनटीएच्या अध्यक्षांच्या नियुक्तीवर केलेल्या वक्तव्यावर राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड संतापले. एनटीए अध्यक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असल्याचं वक्तव्य रामजी सुमन यांनी केलं होतं. यावर धनखड यांनी नाराजी व्यक्त केली.

ही टिप्पणी आपण संसदेच्या रेकॉर्डवर येऊ देणार नाही, असे यावेळी सभापती जगदीप धनखड म्हणले. धनखड म्हणाले की, आरएसएस नि:स्वार्थपणे काम करणारी संस्था आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकाकी पाडण्याचे षडयंत्र कुणालाही करू देणार नाही, असे ते म्हणाले.

RSS राष्ट्रसेवेत गुंतलेली संस्था, उपराष्ट्रपती धनखड यांचं वक्तव्य; राज्यसभेत गदारोळ; पाहा VIDEO
IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरला UPSC चा मोठा झटका; IAS पद तात्पुरतं रद्द, SAAM Impact VIDEO

दरम्यान, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जगदीप धनखड यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत म्हटले की, जोपर्यंत एखाद्या खासदाराने संसदीय कामकाजाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही, तोपर्यंत सभापती कोणत्याही सदस्याला आक्षेप घेऊ शकत नाहीत. खरगे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना धनखड म्हणाले, "काहीही उल्लंघन झाल्यास मी हस्तक्षेप करू शकतो, हे मला मान्य आहे, मात्र येथे खासदार भारतीय संविधानाच्या विरोधात बोलत आहेत. मी संघटनेला एकाकी पाडण्याचा प्रयत्न करू देणार नाही, हे संविधानाचे उल्लंघन आहे. आरएसएसला या देशाच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होण्याचा पूर्ण घटनात्मक अधिकार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com