वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकरला मोठा दणका मिळालाय. पूजा खेडकरचे आयएएस पद तात्पुरतं रद्द करण्यात आले आहे. यूपीएससीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. पूजा खेडकरची उमेदवारी तात्पुरती रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणीमध्ये आणखी वाढ झाली आहे.
पूजा खेडकर प्रकरणात यूपीएससीने सर्वात मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकर यांनी दिल्लीतल्या पटियाला हाऊस कोर्टामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कोर्ट उद्या निर्णय देणार आहे. त्यापूर्वी यूपीएससीने पूजा खेडकरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केले आहे. यूपीएससीने प्रेस नोट जाहीर केली आहे. यामध्ये पूजा खेडकरला २०२२ साली आम्ही दिलेले आयएएस पद तात्पुरतं रद्द करत आहोत असे म्हटले आहे.
यूपीएससीने पूजा खेडकरचे आयएएस पद रद्द केल्यामुळे आता तिला भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचे काढून टाकण्याचे निर्देश दिले आहे. नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकरला दोषी ठरवण्यात आले आहे. पूजा खेडकरने आयएएस होण्यासाठी यूपीएससीची फसवणूक की होती. त्यामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत. पूजा खेडकरविरोधात यूपीएससीने दिल्लीमध्ये गुन्हा दाखल केला होता. पूजा खेडकरला यूपीएससीने चौकशीसाठी बोलावले होते. पण ती अद्याप चौकशीसाठी हजर झालेली नाही. सध्या पूजा खेडकरचा फोन नॉटरिचेबल लागत आहे. त्यामुळे पूजा खेडकर सध्या कुठे आहे असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, बनावट प्रमाणपत्राद्वारे आरक्षणाचा लाभ घेणे, खोटे दिव्यांग प्रमाणपत्र सादर करणे तसेच खासगी वाहनावर लाल अंबर दिवा लावणे, असे विविध आरोप पूजा खेडकरवर आहेत. पूजा खेडकरने यूपीएससीची फसवणूक केली आहे. त्याचसोबत याप्रकरणात तिच्या आई-वडिलांच्या अडचणी देखील वाढल्या आहेत. पूजा खेडकरची आई तुरूंगामध्ये आहे. तर तिच्या वडिलांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. पूजा खेडकरविरोधात यूपीएससीने दाखल केलेल्या गुन्ह्यानंतर तिने पटियाला हाऊस कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. आता यावर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळे उद्या कोर्ट काय निर्णय देतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited By - Priya More
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.