RSSची विचारधारा देशासाठी घातक; मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने राज्यसभेत गदारोळ

Mallikarjun Kharge In Rajyasabha: राज्यसभेत काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानामुळे गोंधळ उडालाय. राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावर आभार प्रस्तावावर चर्चा करताना खरगेंनी हे विधान केलंय. काय म्हणाले काँग्रेस नेते ते जाणून घेऊ.
RSSची विचारधारा देशासाठी घातक; मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने राज्यसभेत गदारोळ
Mallikarjun Kharge Sansad live
Published On

काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून राज्यसभेत गोंधळ झाला.आरएसएस ही मनुवादी संघटना आहे. त्याची विचारधारा देशासाठी घातक आहे. आरएसएस भारतातील संस्था ताब्यात घेतेय. ही देशासाठी चिंतेची बाब आहे. संघाच्या लोकांनी गांधींची हत्या केली होती, विधान खरगे यांनी केलं. ते राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेदरम्यान खरगे बोलत होते.

आरएसएसने गोडसेला चिथावणी देऊन गांधींची हत्या करायला लावली. त्यावेळी राज्यसभेच्या अध्यक्षांनी RSSचा बचाव केला. आरएसएसचे सदस्य असणे हा गुन्हा आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे देशासाठी मोठे योगदान देत आहे, असं राज्यसभेचे अध्यक्ष म्हणाले. खरगे यांनी राज्यसभेत मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान बोलताना खरगेंनी राष्ट्रपतींचे भाषण हे निवडणुकीचे भाषण होतं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणात ना कुठली दृष्टी होती ना कुठली दिशा. त्यांच्या अभिभाषणात दलित, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीयांसाठी काहीही नव्हतं. पंतप्रधान मोदी नेहमीच महिला आणि गरिबांवर बोलतात पण मणिपूर गेलं वर्षभरापासून जळत आहे. पण ते १४ देशात गेले पण आजतागायत मणिपूरला गेले नाहीत, असं खरगे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com