Bull Attack On Woman Video: रात्रीच्या अंधारात महिलेसोबत घडला भयावह प्रकार; थरकाप उडवणारा VIDEO पाहाच

Bull Attack Viral Video: सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात.
Bull Attack On Woman
Bull Attack On Woman Saam TV
Published On

Bull Attack On Woman : सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. मोकाट जनावरांबाबत तुम्ही अनेक तक्रारी ऐकल्या असतील. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना मोकाट जनावरे अचानक धडक देतात. यातून काही जणांना किरकोळ तसेच गंभीर दुखापती सुद्धा झाल्या आहेत. (Latest Marathi News)

Bull Attack On Woman
Viral Video : चाललंय काय? मेट्रो पुन्हा चर्चेत; आता थेट अंघोळीचा व्हिडिओ व्हायरल

असाच काहीसा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Video Viral) होत आहे. या व्हिडीओत एका वृद्ध महिलेला रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बैलाने अचानक शिंगावर उचलून घेतलं आणि दूर फेकलं. या महिलेचं दैव बलवंतर म्हणून एक लहान मुलगा अचानक धावत येतो आणि या बैलाच्या तावडीतून वृद्ध महिलेची सुटका करतो.

हा धाडसी मुलगा कुठलाही विचार न करता आपला जीव धोक्यात घालतो आणि वृद्ध महिलेची या बैलाच्या तावडीतून सुटका करतो. अंगावर काटा आणणारी ही थरारक घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी या मुलाचे कौतुक करीत आहेत. (Breaking Marathi News)

व्हायरल व्हिडीओत काय आहे?

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला रस्त्यावरून जात असताना वाटेत एक बैल उभा आहे. महिला बैलाच्या जवळ येताच बैल तिच्यावर अचानक हल्ला करतो. हा बैल वृद्ध महिलेला शिंगावर उचलून घेतो आणि जमिनीवर फेकतो. या घटनेत महिलेला दुखापत होते आणि ती घरासमोरील गेटसमोर बेशुद्ध पडते.

दरम्यान, ही महिला जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली असताना, अचानक एक मुलगा या महिलेच्या मदतीसाठी धावतो. मात्र, हा मुलगा महिलेकडे जाण्यापूर्वीच बैल या मुलावर हल्ला करतो. बैलाचा हल्ला मुलगा मोठ्या चपळाईने वाचवतो. तरीसुद्धा बैल या मुलाला लाथा मारतो.

बैलाच्या तावडीतून महिलेची सुटका करण्यासाठी हा मुलगा परत उठतो आणि महिलेकडे धावतो. दरम्यान, महिलेला दुसऱ्या बाजूला नेत असताना बैल पुन्हा एकदा त्यांच्यावर हल्ला करतो आणि त्यांना जमिनीवर फेकतो. हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच परिसरातील नागरिक घटनास्थळाकडे धाव घेतात.

एक व्यक्ती काठी घेऊन पळत येतो आणि या बैलाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न करतो. या दोघांना वाचवण्यासाठी इतरही अनेक लोक पुढे येतात. अखेर या संतापलेल्या बैलाच्या तावडीतून मुलगा आणि वृद्ध महिलेची सुटका होते.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com