Shocking : प्रसिद्ध बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्या; 4 दिवसांवर होतं लेकीचं लग्न

gujarat builder try to end life : प्रसिद्ध बिल्डरने स्वत:वर गोळ्या झाडल्याची घटना समोर आलीये. 4 दिवसांवर त्यांच्या लेकीचं लग्न होतं.
gujarat shocking
gujarat builder try to end lifeSaam tv
Published On
Summary

सूरतमधून धक्कादायक घटना समोर

बिल्डर तुषार घेलाणी यांनी स्वत: वर गोळ्या झाडल्या

तुषार घेलाणी यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्याने सर्वत्र खळबळ उडाली

गुजरातच्या डायमंड सिटी सूरतमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. सूरतमधील 'जॉली ग्रुप' चे प्रमुख, बिल्डर तुषार घेलाणी यांनी रविवारी स्वत:वर गोळ्या झाडल्याची घटना समोर आली आहे. घेलाणी यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यांची तब्येत नाजूक असल्याची माहिती समोर येत आहे. लेकीच्या लग्नाची तयारी करत असतानाच त्यांनी स्वत:वर गोळ्या झाडल्याने शहरात चर्चांना उधाण आलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तुषार घेलाणी यांनी रात्रीच्या २ वाजताच्या सुमारास राहत्या घरात स्वत:वर गोळ्या झाडल्या. तुषार यांनी लायसन्स रिवॉल्वरने एक राऊंड फायर केली. तुषार यांनी गोळीबार केल्यानंतर कुटुंबातील सदस्य खोलीत धावले. त्यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून कुटुंबातील सदस्यांच्या पायाखालची जमीन सरकली. घरातील सदस्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केली.

gujarat shocking
कामाला जायची घाई नडली, तरुणी जीवाला मुकली; काळीज पिळवटून टाकणारा CCTV व्हिडिओ

रुग्णालयात दाखल केलेल्या तुषार घेलाणी यांना वेंटिलटरवर ठेवलं आहे. तुषार घेलाणी यांची नाजूक प्रकृती लक्षात घेता कुटुंबीय एअर एब्लुलेन्सने मुंबईला नेण्याची तयारी करत आहेत. तुषार घेलाणी यांच्या मुलीचं ५ फेब्रुवारी रोजी लग्न होतं. घरातील सदस्यांची लग्नाची तयारी सुरू होती. घरात पाहुणे येत होते. मात्र, तुषार घेलाणी यांच्या निर्णयाने खळबळ उडाली.

gujarat shocking
T20 फॉर्मेटचा नवा राजा! 3000 धावांचा ऐतिहासिक टप्पा गाठला; सूर्यकुमार फटकेबाजीचा बादशहा बनला

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तुषार घेलाणी यांनी आत्महत्या करण्यासाठी वापरलेली रिवॉल्वर ताब्यात घेतली आहे. कुटुंबातील सदस्यांनी यामागे घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. परंतु पोलिसांनी कुटुंबीयांच्या आरोपांना दुजोरा दिलेला नाही. पोलीस कुटुंबातील सदस्यांची चौकशी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com