

भारताचा कणर्धार सूर्यकुमार यादव टी२० फॉर्मेटमध्ये सर्वात जलदगतीने 3000 धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. सूर्यकुमारने न्यूझीलंडविरोधातील सीरजच्या ५ व्या सामन्यात ६३ धावांची तुफानी खेळी खेळली. न्यूझीलंडविरोधात खेळणाऱ्या या डावात खेळताना विश्वविक्रमाला गवसणी घातली.
सूर्यकुमारने न्यूझीलंडविरोधात वादळी खेळी खेळली. त्याने गोलंदाज फॉकीला चौकार लगावून ३४ धावा केल्या. तसेच त्याने या धावांच्या मदतीने टी२० फॉर्मेटमध्ये ३००० धावा पूर्ण केल्या. त्याने १८२२ चेंडूत टी२० फॉर्मेटममध्ये विश्वविक्रम केला. यूएईचा फलंदाज मोहम्मद वसीमचा रेकॉर्ड मोडला. मोहम्मद वसीमने हा विक्रम १९४७ धावांमध्ये पूर्ण केला होता.
३५ वर्षीय सूर्यकुमार यादवने टी-२० इंटरनॅशनलमध्ये ३००० धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. रोहित शर्मा (४२३१), विराट कोहली (४१८८) यांच्या यादीत सामील झाला आहे. सूर्यकुमारचा हा फॉर्म आगामी टी-२० वर्ल्ड कपसाठी फायदेशीर ठरणार आहे.
१०४ व्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना सूर्यकुमार यादवने ३६.९५ सरासरी आणि १६५.४८ च्या स्ट्राइक रेटने ३००० धावा कुटल्या. यात २४ अर्धशतक आणि ४ शतकाचा समावेश आहे. यात करिअरचा सर्वाधिक ११७ धावांचाही समावेश आहे.
१,८२२ – सूर्यकुमार यादव
१,९४७ – मुहम्मद वसीम
२,०६८ – जोस बटलर
२,०७७ – आरोन फिंच
२,११३ – डेविड वॉर्नर
सूर्यकुमारने कोणता ऐतिहासिक विक्रम केला?
सूर्यकुमारने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 3000 धावा पूर्ण करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केलाय.
भारतीय खेळाडूंमध्ये सूर्यकुमार कोणत्या स्थानावर आहे?
टी२० आंतरराष्ट्रीयमध्ये 3000 धावा करणारा सूर्यकुमार तिसरा भारतीय फलंदाज ठरलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.