Shocking News in marathi : लग्नाच्या काहीच तासांपूर्वी नवरीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील गुरसहायगंजमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. घरात लग्नाच्या विधी सुरू होत्या. नवरीला हळद लागली होती, हातावर मेहंदी लावण्यात आली होती. नव्या आयुष्याचं स्वप्न पाहणाऱ्या नवरीचा डॉक्टराच्या चुकीमुळे मृत्यू झाला. लग्नाच्य आदल्या दिवशी नवरीच्या पोटात दुखायला सुरूवात झाली. कुटुंबियांनी नवरीला जवळच्या डॉक्टराकडे उपचारासाठी नेलं. पण डॉक्टरांनी दिलेली गोळी खाल्ल्यानंतर नवरीमुलीचा मृत्यू झाला.
कन्नौज जिल्ह्यातील गुरसहायगंज पोलीस स्टेशन हद्दीतील किसवापूर गावात शनिवारी रात्री ही हृदयद्रावक घटना घडली. लग्नाच्या मंगलमय वातावरणात वधू रिंकीचा अचानक मृत्यू झाला. नवरीचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली. वधूच्या कुटुंबीयांनी खासगी डॉक्टरवर चुकीच्या उपचारांचा आरोप लावला आहे. डॉक्टरावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.
लग्नाआधी वधूला पोटदुखी
किसवापूर येथील रिंकी हिचे लग्न उमर्दामधील राहुल याच्याशी ठरले होते. शनिवारी संध्याकाळी राहुल याची वरात रिंकीच्या गावात जाण्यासाठी निघाली होती. त्याचवेळी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास रिंकी मेहंदी लावून वराची वाट पाहत होती. पण त्याचवेळी अचानक जोरात पोटदुखी सुरू झाली. लग्नाच्या कोणत्याही विधीला अडथळा येऊ नये म्हणून कुटुंबाने तिला तात्काळ जवळच्या रूग्णालयात नेलं.
डॉक्टरांकडून उपचार अन्...
रिंकीला डॉक्टरने इंजेक्शन आणि काही औषधे दिले. पण तिची प्रकृती अधिकच खालावली. काही वेळातच ती बेशुद्ध झाली. रिंकीची प्रकृती अतिशय खराब झाल्यामुळे कुटुंबियाने सरकारी रूग्णालयासाठी नेलं, पण जातानाच तिचा मृत्यू झालाय. यावेळी नवरदेवाची वरात अर्ध्या वाटेवर होती. रिंकीच्या मृत्यूची बातमी समजताच नवरदेव राहुल आणि वरात माघारी फिरली. नंतर राहुल रिंकीच्या कुटुंबाला भेटण्यासाठी किसवापूरला पोहोचला.
डॉक्टरवर चुकीच्या उपचारांचा आरोप
रिंकीचे वडील महेश बाथम यांनी डॉक्टरांवर चुकीच्या उपचाराचा आरोप केला. खासगी डॉक्टरने चुकीची औषधे दिल्याने मुलीचा जीव गेला, असा आरोप त्यांनी केला. ते याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करणार आहेत. डॉक्टरवर कायदेशीर कारवाईची मागणी करणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.