Political News : न्यायाधीशाच्या कुटुंबाला धमकावलं, भाजप आमदारावर गुन्हा दाखल; राजकीय वर्तुळात खळबळ

Rajasthan Political News : जयपूरमध्ये भाजप आमदार बाबा बालमुकुंद आचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर आमदार आणि समर्थकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
BJP MLA Balmukund Acharya News
BJP MLA Balmukund Acharya News AI Image
Published On: 

राजस्थानमधील जयपूरच्या हवामहल विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार बाबा बालमुकुंद आचार्य यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एका सेशन जज यांच्या घरासमोर समर्थकांसह जाऊन गोंधळ घातल्याचा आणि त्यांच्या कुटुंबीयांना परिसर सोडण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप आमदारांवर करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी आमदारांसह त्यांच्या काही समर्थकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरमधील गलता गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मीणा कॉलनीमध्ये सेशन जज मोहम्मद आरिफ यांनी जुने घर खरेदी केले होते. या घराची दुरुस्तीचे काम सुरू असताना काही स्थानिक नागरिकांनी त्याला विरोध केला होता. या प्रकरणात १० डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आमदार बालमुकुंद आचार्य आपल्या समर्थकांसह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घरातील दुरुस्तीचे काम थांबवले आणि तेथे बराच वेळ गोंधळ घातला. यावेळी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करण्यात आली तसेच जज यांच्या कुटुंबीयांना धमकावण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

BJP MLA Balmukund Acharya News
Gold Rate Today : लग्नसराईच्या काळात सोने-चांदीच्या दरात वाढ; १ तोळ्याची किंमत काय? वाचा २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

या घटनेनंतर जज यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला. त्यानंतर मोहम्मद आरिफ यांचे चुलत भाऊ मोहम्मद याकूब यांनी न्यायालयात धाव घेतली. अनेक महिन्यांच्या सुनावणीनंतर न्यायालयाने पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी BNS कायद्याच्या कलम 61(2), 196(1)(a), 197(1)(b), 299 आणि 351(2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

BJP MLA Balmukund Acharya News
Back Pain : कॅन्सरपेक्षा कंबरदुखी खतरनाक, नेहमीच्या 'या' ५ सवयी ठरतायत धोकादायक

दरम्यान, आमदार बालमुकुंद आचार्य यांनी सर्व आरोप फेटाळले नसले तरी आपण पोलिस तपासात सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे. स्थानिक नागरिकांच्या फोननंतर आपण घटनास्थळी गेलो होतो, असा त्यांचा दावा आहे. तसेच जज यांच्यावरही त्यांनी गंभीर आरोप केले आहेत. दुसरीकडे, मोहम्मद आरिफ यांनी आमदारांच्या दबावामुळे महापालिकेने त्यांचे घर सील केल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे घराची दुरुस्ती करता येत नसल्याचेही त्यांनी सांगितले. या प्रकरणावरून काँग्रेसने भाजपवर टीका केली असून चौकशी करण्याची मागणी केली आहे. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.