Breaking News : लोकसभेच्या अधिवेशनाआधी काँग्रेसला मोठा धक्का; खासदाराची प्रकृती खालवली, रुग्णालयात दाखल

Congress Leader K Sudharkan Health Update : राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस खासदार के. सुधाकरन यांना अचानक दुबईतील रुग्णालयात ICU मध्ये हलवण्यात आले.
Congress MP K. Sudhakaran has been shifted to the ICU
Congress MP K. Sudhakaran has been shifted to the ICUAI Image
Published On: 

लोकसभेत सोमवारी मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या वेळी काँग्रेसचे खासदार के. सुधाकरन दुबईतील रुग्णालयात दाखल असल्याने पक्षाची चिंता वाढली आहे. त्यांना सध्या अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले आहे.

सुधाकरन यांचा मुलगा संजोग यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे वडील शुक्रवारी नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना काही न्यूरोलॉजिकल समस्या असल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील ४८ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. शनिवारी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. रविवारी त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळेल, अशी अपेक्षाही होती.

Congress MP K. Sudhakaran has been shifted to the ICU
Breaking News : उद्धव ठाकरे यांची प्रकृती बिघडली; चेन्नई दौरा रद्द

मात्र, रविवारी दिल्लीला परतण्याची तयारी सुरू असतानाच त्यांना अचानक ICU मध्ये हलवण्यात आल्याचा दावा त्यांच्या मुलाने केला आहे. यावेळी कुटुंबीयांना त्यांची भेट घेण्यासही परवानगी देण्यात आली नाही. रुग्णालयातील डॉक्टरांनी वरिष्ठांचा फोन आल्याचे सांगितल्याचा आरोप संजोग यांनी केला. त्यामुळे या प्रकरणामागे काही दबाव किंवा राजकीय हस्तक्षेप आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Congress MP K. Sudhakaran has been shifted to the ICU
Vande Bharat : केंद्र सरकारचा मोठा निर्णय! वंदे भारतसह सर्व रेल्वे गाड्यांतून मोफत प्रवास करता येणार, कोणाला मिळणार हा लाभ?

या घटनेनंतर केरळ काँग्रेसनेही चिंता व्यक्त केली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सनी जोसेफ यांनी खासदाराच्या कुटुंबीयांना भेटण्यापासून रोखणे गंभीर बाब असल्याचे म्हटले. काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनीही सुधाकरन यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क न झाल्याने त्यांनी त्यांच्या मुलाशी चर्चा केली.

Congress MP K. Sudhakaran has been shifted to the ICU
Winter Chilblains : थंडीमध्ये हात-पायांना खाज, जळजळ आणि सूज येतेय? दुर्लक्ष करणं पडेल महागात

दरम्यान, सुधाकरन हे २०२१ ते २०२४ या काळात केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. अलीकडच्या काळात पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचे मतभेद असल्याची चर्चा होती. कन्नूरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची त्यांची इच्छा होती. मात्र, पक्षाच्या निर्णयामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. आता महत्त्वाच्या विधेयकावरील मतदानाच्या आधीच ते रुग्णालयात असल्याने काँग्रेस आणि इंडिया आघाडीसमोर नवी चिंता निर्माण झाली आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत आणि पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.