BrahMos ने पाकला दिवसा दाखवले तारे, ब्रह्मोसपुढे पाकची AWACS प्रणाली बेचिराख

BrahMos Missile नं पाकिस्तानला दिवसा चांदण्या दाखवल्याची कबुलीच पाकच्या निवृत्त एअऱ मार्शलनं दिलीय...निवृत्त एअर मार्शलनं नेमकं काय म्हटलंय? आणि पाकिस्तानात ब्रम्होसनं कसा विध्वंस घडवला? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट..
BrahMos Missile
BrahMos MissileX
Published On

खुद्द भारताच्या संरक्षण मंत्र्यानीच ब्रह्मोस मिसाईलनं पाकची कशी झोप उडवली हे जाहीरपणे सांगितलय. पाकनं भारतविरोधात ड्रोन आणि क्षेपणास्त्राचा वापर करत हल्ला केला आणि प्रत्युत्तरा दाखल पाकिस्तानी हवाई तळांवर एकापाठोपाठ 15 ब्रह्मोस मिसाईल डागण्यात आले. पाकिस्तानला ज्या AWACS म्हणजेच एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टीमवर अवाजवी विश्वास होता. त्याच प्रणालीला ब्रह्मोसनं बेचिराख करून टाकलं. आणि याची थेट कबुलीच पाकिस्तान दिलीय.

ब्रह्मोसच्या हल्ल्यामुळं पाकला आयुष्यभराची अद्दल घडलीय. युनायटेड स्टेट्समधील युद्धभ्यासाचे तज्ज्ञ निवृत्त कर्नल जॉन स्पेन्सर यांनी ब्रह्मोस पाकिस्तानात कुठेही आणि कधीही मारा करण्य़ास सक्षम असून चिनी हवाई संरक्षण प्रणाली ब्रह्मोसपुढे टिकाव धरू शकत नसल्याच सांगत ब्राम्होसच्या ताकदीवर शिक्कामोर्तब केलंय.

BrahMos Missile
Beed Crime : बीडमधील गुन्हेगारी संपेना! तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण, हादरवणारा व्हिडीओ समोर

जगात भारी 'ब्रह्मोस क्षेपणास्त्र'

ब्रह्मोस क्षेपणास्त्राची मारक क्षमता 290 किलोमीटर

भारत आणि रशियाच्या ब्रह्मोस एरोस्पेसने केले विकसित

200-300 किलोची अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम

जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम

S-400 मिसाईल सिस्टमपेक्षा प्रगत

पाककडील AWACS कंट्रोल सिस्टम चीन आणि स्वीडननं विकसित केलेली आहे. या चिनी शस्त्रास्त्रांचा भारतविरोधात वापर करून पाक आता चांगलाच तोंडघशी पडलाय..

BrahMos Missile
Pune News : पुणे पोलीस आयुक्तांचा मारणे टोळीला दणका, गुन्हे शाखेने केली मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com