Blast In Factory: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ कामगारांचा जागीच मृत्यू; आसपासची गावं हादरली

Blast in Firecracker Factory: प्रयागराजमध्ये फटाक्याच्या कारखान्यात दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये ८ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
Blast In Factory: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ कामगारांचा जागीच मृत्यू; आसपासची गावं हादरली
Blast in Firecracker Factory:Saam Tv
Published On
  • उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये भीषण स्फोट

  • फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट होऊन ८ कामगारांचा मृत्यू

  • स्फोट झाला तेव्हा कारखान्यात २० कामगार करत होते काम

  • मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे

उत्तर प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटामध्ये ८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना प्रयागराज- कौशांबी सीमेवरील मोहम्मदपूर गावात घडली. हे ठिकाणी मनौरी हवाई दल तळापासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर आहे. या स्फोटामुळे आसपासची गावं हादरली. ही स्फोटाची घटना घडली तेव्हा कारखान्यात कामगार काम करत होते. या स्फोटामध्ये अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कौशांबी जिल्ह्यातील मोहम्मदपूर गावात दुपारी साडेबारा वाजता ही स्फोटाची घटना घडली. हे गाव प्रयागराजच्या सीमेवर वसलेले आहे. स्फोट झाला तेव्हा फटाक्याच्या कारखान्यात अनेक कामगार काम करत होते. स्फोटामुळे संपूर्ण कारखाना जमीदोस्त झाला. ढिगाऱ्याखाली अनेक कामगार अकडले आहेत. भीषण स्फोटात ८ कामगारांचा जागीच मृत्यू झाला. कारखान्याच्या १०० मीटर परिसरातील घरांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक घरांच्या भिंतींना मोठ्या भेगा पडल्या. तीन घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत.

Blast In Factory: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ कामगारांचा जागीच मृत्यू; आसपासची गावं हादरली
IED Blast: आसाम रायफल्सच्या वाहनामध्ये मोठा स्फोट; एक जवान शहीद, चार जण जखमी

या स्फोटानंतर पोलिस, हवाई दल, एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे २०० जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्तळावर बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. १० बुलडोझरच्या सहाय्याने ढिगारा हटवून जखमींना बाहेर काढण्यात येत आहे. ढिगाऱ्याखाली काही जण गाडले गेल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Blast In Factory: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ कामगारांचा जागीच मृत्यू; आसपासची गावं हादरली
Mumbai 2011 Bomb Blast : १२ मिनिटात ३ बॉम्बस्फोट; १५ वर्षांपूर्वी मुंबई हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन मंजूर

हा स्फोट झाला तेव्हा कारखान्यामध्ये २० कामगार काम करत होते. स्फोटानंतर कारखान्याच्या जवळ असलेल्या घरांची पडझड झाली यामध्ये अनेक जण जखमी झाले. स्फोटाचा आवज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू गेला. कारखान्यात स्फोट होऊन भीषण आग लागली. परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या स्फोटानंतर कारखान्यात फटाक्यांचे सतत स्फोट होत आहेत. ज्या कारख्यान्यात हा स्फोट झाला त्या कारखान्याचा मालक आदिल असल्याचे सांगितले जात आहे.

Blast In Factory: फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट, ८ कामगारांचा जागीच मृत्यू; आसपासची गावं हादरली
Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com