Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला

Jharkhand Factory Blast: झारखंडमध्ये रात्रीच्या सुमारास कंपनीत मोठा स्फोट होऊन ३ इंजिनिअर्सचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेत एका कामगार देखील जखमी झाला आहे.
Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला
Jharkhand Factory BlastAI Photo
Published On
  • झारखंडच्या रामगड जिल्ह्यात कंपनीत भीषण स्फो

  • कंपनीत स्फोट होऊन ३ इंजिनिअर्सचा मृत्यू

  • स्फोटानंतर कंपनीच्या परिसरात भीषण आग

  • या आगीत एका कामगाराला गंभीर दुखापत झाली

झारखंडमध्ये कंपनीत मोठा स्फोट होऊन ३ इंजिनिअरचा दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री रामगड जिल्ह्यात ही दुर्घटना घडली. स्पंज आयरन कंपनीत रात्री अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोटानंतर कंपनीला भीषण आग लागली. या आगीमध्ये होरपळून तीन इंजिनिअरचा जागीच मृत्यू झाला आणि एक कामगार गंभीर जखमी झाला. या स्फोटामुळे आसपासचा परिसर हादरून गेला. सध्या कंपनीच्या परिसरात भीतीचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पात्रातू ब्लॉकच्या बरकाना ओ.पी. क्षेत्रांतर्गत हेहल येथे 'मा चिन्नमस्तिका सिमेंट अँड स्टील प्रायव्हेट लिमिटेड' ही कंपनी आहे. या c पॉवर प्लांटमध्ये रात्री अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला. स्फोटानंतर संपूर्ण कंपनीत आग वेगाने पसरली. कंपनीमध्ये काम करणारे ३ इंजिनिअर या आगीमध्ये गंभीररित्या भाजले गेले. तर कामगार गंभीररित्या जखमी झाला.

Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला
Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

कंपनीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. पोलिसांनी देखील तात्काळ घटनास्थळी आले आणि त्यांनी तिघांचे मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमी झालेल्या एका कामगाराला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. या कामगाराची प्रकृती चिंताजनक आहे. ३ इंजिनिअरच्या मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला
IED Blast: आसाम रायफल्सच्या वाहनामध्ये मोठा स्फोट; एक जवान शहीद, चार जण जखमी

मृतकांमध्ये रांचीचे रहिवासी आणि फॅक्टरी शिफ्ट इन-चार्ज असलेले ५० वर्षीय संजीव कुमार केसरी, बोकारोचे रहिवासी असलेले २५ वर्षीय विनीत महातो आणि गरवाचे रहिवासी असलेले २४ वर्षीय अभिषेक पांडे यांचा समावेश आहे. या आगीमध्ये कामगार तरुण राजवार गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रांची रोडवरील 'द होप हॉस्पिटल'मध्ये दाखल करण्यात आले आहे. तो हजारीबागचे रहिवासी आहेत. कंपनीत स्फोट आणि आग नेमकी कशी लागली यामागचे कारण शोधले जात आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा चौकशी करत आहेत.

Company Blast: कंपनीमध्ये अचानक मोठा स्फोट, ३ इंजिनिअर्सचा होरपळून मृत्यू; संपूर्ण परिसर हादरला
Mumbai 2011 Bomb Blast : १२ मिनिटात ३ बॉम्बस्फोट; १५ वर्षांपूर्वी मुंबई हादरवणाऱ्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपीला जामीन मंजूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com