बाराबंकीतील नगर कोतवाली परिसरात बुधवारी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात भाजप युवा मोर्चाचे माजी नगर उपाध्यक्ष आलोक सिंह त्यागी (वय 27) यांचा मृत्यू झाला. ते आपल्या दुचाकीवरून घरी परतत असताना ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, लखपेडाबाग परिसरातील रहिवासी आलोक सिंह त्यागी हे बुधवारी उशिरा रात्री नगर कोतवालीसमोरून जात होते. त्याचवेळी एका भरधाव वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, आलोक गंभीररित्या जखमी झाले.
अपघातानंतर स्थानिक लोकांनी त्यांना पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. त्या ठिकाणी त्यांना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांना कळवण्यात आले. कुटुंबीय आणि नातेवाईकांनी सांगितले की, आलोक सिंह त्यागी हे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे माजी नगर उपाध्यक्ष होते. ते सामाजिक कार्यातही सक्रिय सहभागी होत असायचे.
घटनेनंतर नगर कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अपघातग्रस्त डीसीएम वाहन ताब्यात घेतले आहे. वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. गुरुवारी शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.
या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून तपासाच्या निष्कर्षांनुसार पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच आलोक सिंह त्यागी यांच्या निधनाची बातमी समजताच भाजपमध्ये शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.