Political News: भाजपला मोठा हादरा, ६ वेळा मंत्री राहिलेल्या नेत्याने सोडली साथ

Former Minister Ram Aashray Kushwaha Quits BJP: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. भाजपच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली आणि समाजवादी पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला.
Ram Aashray Kushwaha
Former Minister Ram Aashray KushwahaSaam Tv
Published On: 
  • माजी मंत्री राम आश्रय कुशवाहा यांनी भाजपची साथ सोडली

  • राम आश्रय कुशवाहा यांनी समाजवादी पार्टीत पक्षप्रवेश केला

  • १३ वर्षांनंतर त्यांनी समाजवादी पार्टीत घरवापसी केली

  • अखिलेश यादव यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

Ram Aashray Kushwaha Quits BJP: उत्तर प्रदेशच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का बसला. ६ वेळा मंत्री राहिलेल्या बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली. राम आश्रय कुशवाहा यांनी गुरूवारी भाजपला रामराम ठोकत समाजवादी पार्टीमध्ये प्रवेश केला. १३ वर्षांनंतर राम आश्रय कुशवाहा यांनी सपामध्ये घरवापसी केली.

राम आश्रय कुशवाहा यांनी समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी अखिलेश यादव यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्याची शपथ घेतली. सपामध्ये प्रवेश करताना त्यांनी सांगितले की, त्यांना अजूनही असे वाटत आहे की नेताजी म्हणजेच मुलायम सिंह यादव अजूनही त्यांच्यातच आहेत. अखिलेश यादव यांना देखील तेच पद आणि आदर मिळाला पाहिजे. जिथे आदर आहे तिथे तुम्हाला काही तरी मिळेल. जिथे आदर नाही तिथे तुम्हाला काहीही मिळणार नाही. मग ते राजकारण असो, संबंध असो किंवा व्यवसाय असो.'

Ram Aashray Kushwaha
BJP Vs MNS : कल्याण-डोंबिवलीचं राजकारण तापलं! सत्ताधारी भाजप-मनसेतच जुंपली; काळेंची टीका, म्हात्रेंचा इशारा

राम आश्रय कुशवाहा यांनी यावेळी सर्व समर्थकांना शपथ घेण्याचे आवाहन करत सांगितले की, जोपर्यंत अखिलेश यादव मुख्यमंत्री होत नाहीत तोपर्यंत ते घरी बसणार नाहीत. दरम्यान, राम आश्रय कुशवाहा हे कानपूरचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात बहुजन समाज पक्षातून केली. १९९६ मध्ये ते बसपाच्या तिकीटावर आमदार झाले. त्यानंतर ते समाजवादी पार्टीमध्ये आले. सपामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस म्हणूनही काम केले. ते मुलायम सिंह यादव यांचे निकटवर्तीय मानले जात होते.

Ram Aashray Kushwaha
BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

राम आश्रय कुशवाहा हे गेल्या अनेक वर्षांपासून उत्तर प्रदेशच्या राजकारणात सक्रीय आहेत. त्यांनी विविध संघटनांमध्ये काम केले असून सरकारमध्येही अनेक पदे भूषवली आहेत. त्यांची राजकिय ओळख ओबीसीचे नेते अशी आहे. राम आश्रय कुशवाहा २०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. याच काळात मुझफ्फरनगर दंगलींवरील त्यांची भूमिका उघडकीस आली. यानंतर त्यांना पक्षाच्या पदावरून हटवण्यात आले. त्यानंतर त्यांनी समाजवादी पार्टीची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Ram Aashray Kushwaha
BJP MLA : ४,००० कोटींची संपत्ती, पण भाजप आमदाराने मागितली भीक; मिळाले फक्त ८४ रुपये, राज्यात चर्चा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com