महापालिकेच्या महासभेत हायव्होल्टेज ड्रामा! भाजप-सेनेत शाब्दिक चकमक; भाजप नगरसेवकाचं निलंबन

BJP Corporator Suspended: उल्हासनगर महापालिकेच्या महासभेत भाजप आणि शिवसेनेत जोरदार शाब्दिक चकमक झाली. महापौर अश्विनी निकम आणि भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्यातील वादानंतर निलंबनाची कारवाई झाल्याची माहिती आहे.
Ulhasnagar General Body Meeting Drama; Bjp Corporator Suspended After Verbal Clash
Ulhasnagar General Body Meeting Drama; Bjp Corporator Suspended After Verbal Clashsaam tv
Published On: 
Summary
  • महापालिकेच्या महासभेत भाजप-शिवसेनेत पुन्हा संघर्ष पाहायला मिळाला.

  • या प्रकरणानंतर भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांच्या निलंबनाची कारवाई

  • उल्हासनगर महापालिकेतील भाजप-शिवसेना संघर्षामुळे स्थानिक राजकारण पुन्हा चर्चेत

अजय दुधाणे, साम प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून उल्हासनगर महापालिकेत शिवसेना-भाजपमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. तब्बल तीन महिन्यांनंतर आयोजित करण्यात आलेली महासभेत पुन्हा भाजप-शिवसेना आमनेसामने आले. याला कारण भाजप नगरसेवक प्रधान पाटील ठरले असून त्यांनी महापौर अश्विनी निकम यांना अपशब्द वापरल्याने चांगलाच गदारोळ झाला.

Ulhasnagar General Body Meeting Drama; Bjp Corporator Suspended After Verbal Clash
नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

महापौर अश्विनी निकम यांच्या पूर्वपरवानगीशिवाय भाजप नगरसेवक प्रधान पाटील हे प्रभागातील विषयावर बोलण्यासाठी उभे राहिल्याने वादाला सुरुवात झाली. यावरून महापौर आणि प्रधान पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली.याचदरम्यान प्रधान पाटील यांच्याकडून महापौरांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप करण्यात आला.

यानंतर संतप्त झालेल्या महापौर अश्विनी निकम यांनी, “भाषा नीट वापरा, तुम्ही माझा बाप काढला,” असे सुनावत प्रधान पाटील यांना फटकारलं. त्यानंतर महापौरांनी प्रधान पाटील यांचे तीन महासभांसाठी निलंबन केल्याचे जाहीर केले. या कारवाईच्या निषेधार्थ भाजप नगरसेवकांनी सभागृहातच ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे तब्बल तीन महिन्यांनंतर झालेली महासभा विकासाच्या मुद्द्यांपेक्षा भाजप-सेनेतील या वादामुळेच चांगलीच गाजली.

तब्बल तीन महिन्यांनंतर आयोजित करण्यात आलेल्या महासभेत नगरसेवक प्रश्न मांडत होते. यावेळी महापौर अश्विनी निकम यांची परवानगी न घेता भाजप नगरसेवक प्रधान पाटील उभे झाले. त्यानंतर महापौर अश्विनी निकम यांनी तुम्ही बसा, असे बजावले. तसेच सध्या दुसऱ्यांना वेळ दिली आहे. तुम्ही हात वर केला का असा प्रश्न केला. यावर तुम्ही आम्हाला बोलायला वेळ देत नाही असा आरोप भाजप नगरसेवक पाटील यांनी केली.

Ulhasnagar General Body Meeting Drama; Bjp Corporator Suspended After Verbal Clash
...तर OBC साठी स्वतंत्र पक्ष काढणार; बड्या नेत्याचा सरकारला इशारा, पडळकरांवरही हल्लाबोल

यावरून महापौर आणि प्रधान पाटील यांच्यात जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. याचदरम्यान प्रधान पाटील यांच्याकडून महापौरांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द वापरला. त्यांचा बाप काढण्यात आला. यावेळी संतप्त झालेल्या महापौर अश्विनी निकम यांनी, “भाषा नीट वापरा, तुम्ही माझा बाप काढला,” असे सुनावत प्रधान पाटील यांना फटकारले. तसेच अर्ध्या तासासाठी बाहेर जाण्याचे निर्देश दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com