BJP MP : भाजप खासदाराच्या कारला भीषण अपघात; हात फ्रॅक्चर, गाडीत होते ४ जण, नेमकं काय घडलं?

BJP MP Car Accident : छत्तीसगडमधील भाजपच्या राज्यसभा खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या कारला खरोरा परिसरातील बंगोलीजवळ अपघात झाला. या दुर्घटनेत त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून त्यांना रायपूरच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Lakshmi Verma Accident Update
Lakshmi Verma Accident UpdateSaam TV
Published On: 

Lakshmi Verma Accident Update : छत्तीसगडमधील भाजपच्या राज्यसभा खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या कारचा शुक्रवारी भीषण अपघात झाला आहे. बलौदाबाजारहून रायपूरकडे परतताना कार अपघातग्रस्त झाली. या भयंकर अपघातात खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले आहे. उपचारासाठी त्यांना रायपूर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात झाला तेव्हा कारमध्ये त्यांचा मुलगा, गनमॅन आणि चालक असे एकूण चार जण होते. चालक आणि गनमॅन यांनाही किरकोळ दुखापत झाली असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

चालकाच्या पायाला, छातीला आणि हाताला दुखापत झाली आहे. तर गनमॅनला किरकोळ दुखापत झाल्याचे समजतेय. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. खरोरा पोलिसांनी या अपघाताची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णूदेव साय यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करत या घटनेबद्दल दुःख व्यक्त केले. लक्ष्मी वर्मा यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप खासदार लक्ष्मी वर्मा बलौदाबाजार जिल्ह्यातील एका कार्यक्रमाला गेल्या होत्या. कार्यक्रमानंतर सायंकाळी त्या रायपूरला परत येत होत्या. त्यावेळी खरोरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बंगोलीजवळ त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या दुसऱ्या वाहनाशी टक्कर झाली. प्राथमिक माहितीनुसार, खासदारांचा डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. अपघात झाला त्यावेळी गाडीत त्यांचा मुलगा, अंगरक्षक आणि चालकही होते. चालकाच्या छातीलाही दुखापत झाली आहे.

Lakshmi Verma Accident Update
Express Train : महाराष्ट्राला मिळाली आणखी एक नवीन एक्स्प्रेस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

अपघातात खासदार लक्ष्मी वर्मा यांच्या हाताला दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. उपचारासाठी खासदार लक्ष्मी वर्मा यांना एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगितले. एम्सच्या डॉक्टरांच्या मते, खासदारांचा हात फ्रॅक्चर झाला आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Lakshmi Verma Accident Update
सोलापूर जिल्हा बँकेवर पहिल्यांदाच भाजपची सत्ता; काँग्रेस-राष्ट्रवादीचा दारुण पराभव, विजेत्यांची यादी एका क्लिकवर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.