Rajya Sabha Election : मोठी अपडेट! आणखी २ मंत्री बाहेर पडणार, ४ नव्या चेहऱ्यांना संधी; PM मोदींच्या नव्या टीममध्ये कोण?

Rajya Sabha Election Political News : राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजपने ८ नव्या उमेदवारांची घोषणा केली. बी.एल. वर्मा आणि हरदीप सिंह पुरी यांना संधी न मिळाल्याने मोदी मंत्रिमंडळातील संभाव्य बदलांची चर्चा सुरू झाली आहे.
BJP Rajya Sabha Candidates 2026 Modi Cabinet Reshuffle & New Faces
BJP Rajya Sabha Candidates 2026 Modi Cabinet Reshuffle & New FacesAI Image
Published On: 
Summary
  • भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी ८ नव्या उमेदवारांची नावे जाहीर केली

  • बी.एल. वर्मा आणि हरदीप सिंह पुरी यांना पुन्हा राज्यसभेची संधी नाही

  • मोदी मंत्रिमंडळात ४ नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

Rajya Sabha Election 2026 Modi Cabinate Update News राज्यसभा निवडणुकीपूर्वी भाजप अलर्ट मोडवर आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची घोषणा सुरू केली असून काल म्हणजेच सोमवारी पक्षाकडून ८ नवीन चेहऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली. मात्र, या यादीत केंद्रीय मंत्री राहिलेल्या बी.एल. वर्मा आणि हरदीप सिंह पुरी यांना पुन्हा राज्यसभेची संधी न मिळाल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही नेत्यांना भविष्यात कोणती जबाबदारी दिली जाणार, याबाबत भाजपकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच या व्यतिरिक्त मोदींच्या मंत्रिमंडळात आणखी ४ नवीन चेहऱ्यांची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे.

बी.एल. वर्मा आणि हरदीप सिंह पुरी यांचा राज्यसभेतील कार्यकाळ नोव्हेंबरमध्ये संपणार आहे. संविधानाच्या अनुच्छेद 75(5) नुसार, एखादा मंत्री सलग सहा महिने संसद सदस्य नसल्यास त्याला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागतो. त्यामुळे आगामी काळात मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात काही नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.

BJP Rajya Sabha Candidates 2026 Modi Cabinet Reshuffle & New Faces
Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

राज्यसभेत पुन्हा प्रवेश न मिळालेल्या हरदीप सिंह पुरी, बी.एल. वर्मा, रवनीत सिंह बिट्टू आणि जॉर्ज कुरियन यांच्या जागी आता चार नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. रवनीत सिंह बिट्टू यांनी जुलैमध्ये रेल्वे राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राज्यसभा कार्यकाळ जूनमध्ये संपला होता. पंजाबमध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिट्टू यांना भाजपकडून मोठी संघटनात्मक जबाबदारी दिली जाऊ शकते, अशीही चर्चा आहे.

BJP Rajya Sabha Candidates 2026 Modi Cabinet Reshuffle & New Faces
Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

दुसरीकडे, जॉर्ज कुरियन यांनीही जूनमध्ये राज्यसभा कार्यकाळ संपल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. ते अल्पसंख्याक व्यवहार राज्यमंत्री होते. कुरियन यांना पक्ष संघटनेत महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपने जाहीर केलेल्या नव्या राज्यसभा उमेदवारांच्या यादीत धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पांडेय, प्रियंका सिंह रावत, रामप्रताप सिंह चौहान आणि श्रुती गंगवार यांचा समावेश आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपच्या संघटनेतही मोठे बदल झाले आहेत. त्यामुळे आता सरकारमधील काही अनुभवी नेत्यांना संघटनेत महत्त्वाची जबाबदारी देऊन नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी दिली जाणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com