Weather Update : राज्यात उकाडा वाढला! मुंबईसह 'या' जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट; वाचा हवामान खात्याचा अंदाज

Maharashtra Today Weather Update News : महाराष्ट्रातून मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून अनेक भागांत उन्हाचा चटका वाढला आहे. मुंबई, कोकणासह काही जिल्ह्यांत उष्णतेचा यलो अलर्ट, तर सातारा, कोल्हापूर आणि गडचिरोलीत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update News
Maharashtra Weather Update News AI Image
Published On: 
Summary
  • महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

  • पुढील दोन-तीन दिवसांत आणखी भागांतून माघार घेण्याची शक्यता

  • मुंबई, कोकणासह काही भागांत उष्णतेचा यलो अलर्ट

  • सातारा व कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोलीत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

मॉन्सूनने राज्यातून परतीचा प्रवास सुरू केल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा एकदा उन्हाचा चटका वाढू लागला आहे. राज्यातील अनेक भागांत सध्या मुख्यतः कोरडे आणि उष्ण हवामान जाणवत आहे. मात्र, पश्चिम महाराष्ट्रासह पूर्व विदर्भातील काही भागांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, कोकणासह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा यलो अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, मॉन्सूनने महाराष्ट्राच्या जवळपास निम्म्या भागातून माघार घेतली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत मराठवाडा, विदर्भाचा बहुतांश भाग आणि राज्यातील आणखी काही भागांतून मॉन्सून परतण्याची शक्यता आहे. त्यामुळे पावसाळ्याचा शेवटचा टप्पा सुरू झाला असून, आता राज्यात तापमानाचा पारा हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो.

Maharashtra Weather Update News
Home Remedies : घरात वारंवार कोळ्याची जळमट होतायत? 'हे' 6 उपाय दूर करतील तुमचं टेन्शन

मध्य महाराष्ट्रातील सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथा तसेच विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Maharashtra Weather Update News
Rat Control : घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? 'या' ६ घरगुती ट्रिक्स वापरून कायमचा काढा तोडगा

पावसादरम्यान नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दुसरीकडे, राज्यातील उर्वरित भागात दिवसभर उन्हाचा चटका जाणवण्याबरोबरच वातावरणात उकाडाही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मॉन्सूनच्या परतीचा वेग वाढत असताना राज्यात आता हवामानात झपाट्याने बदल होताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com