BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

BJP Parliamentary Board: संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी भाजप आपल्या संसदीय मंडळात फेरबदल करण्याची शक्यता आहे. २० जुलैपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचीही शक्यता वर्तवली जातेय.
Konkan Sawantwadi Politics
मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील मंत्रिमंडळाचा पहिला Saam tv
Published On
Summary
  • 20 जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे.

  • अधिवेशनापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता वर्तवली जात आहे.

  • भाजपच्या संसदीय मंडळात लवकरच मोठे फेरबदल होण्याची चर्चा रंगली आहे.

संसदेचे पावसाळी अधिवेशन 20 जुलैपासून सुरु होणार आहे. त्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कोणत्या नेत्याला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे. त्यातच आता भाजपमध्ये मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपच्या संसदीय मंडळात लवकरच फेरबदल करण्यात येणार आहे.

Konkan Sawantwadi Politics
K Annamalai : भाजपला मोठा धक्का, के. अन्नामलाई यांचा राजीनामा; नव्या राजकीय पक्षाची घोषणा

दोन दिवसापूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची बैठक पार पडली. यामध्ये येत्या काळात होत असलेल्या विस्ताराबाबत विस्तृतपणे चर्चा झाली. आता भाजपच्या संसदीय मंडळात लवकरच फेरबदल करण्यात येतील असं सांगितलं जातंय. त्यामध्ये महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांना लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.

Konkan Sawantwadi Politics
UP Politics: मंत्रिमंडळ विस्तारावरून भाजपमध्ये नाराजी उफाळली? माजी खासदाराच्या विधानाने खळबळ

केंद्रातील नव्या टीमची आखणी करण्यासाठी 2 जुलैला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन आणि राष्ट्रीय सरचिटणीस बी एल संतोष या तिघांमध्ये तीन सविस्तर चर्चा झाली. मंत्रिमंडळ विस्तार आणि फेरबदलाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

याबाबत लवकरच यासंदर्भातील घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ फेररचनेत काही केंद्रीय मंत्र्यांना पक्ष संघटनेत पुन्हा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाऊ शकतात. तर पक्षातील काही दिग्गज पदाधिकाऱ्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपदाची संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

नितीन नबीन यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्यात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखालील टीममध्ये तरुण आणि नव्या चेहऱ्यांना घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर अनुभवी वरिष्ठ नेते आणि नव्या पिढीतील नेत्यांचा समतोल साधण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रीय सचिव तसेच केंद्रीय मीडिया टीममधील नियुक्त्यांबाबतीत उच्चस्तरीय चर्चा सुरु आहे. पक्षाच्या नव्या टीम तयार करताना प्रादेशिक, राज्यनिहाय आणि जातीय प्रतिनिधित्वाला महत्व दिले जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com