BJP : भाजपच्या सर्वात महत्वाच्या संसदीय बोर्डात मोठे बदल; नितीन गडकरींना स्थान नाही

भाजपच्या केंद्रीय संसदीय बोर्डात मोठे बदल करण्यात आले आहेत. नितीन गडकरींना स्थान देण्यात आलं नाही.
bjp new parliamentary board nitin gadkari PM modi
bjp new parliamentary board nitin gadkari PM modi SAAM TV
Published On

Bjp Parliamentary Board | नवी दिल्ली: भाजपने आपल्या संसदीय बोर्डात मोठे बदल केले आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी संसदीय बोर्डात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि के. लक्ष्मण यांना या संसदीय बोर्डात स्थान दिले आहे. तर संसदीय बोर्डातून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना स्थान दिलेले नाही.

bjp new parliamentary board nitin gadkari PM modi
मुंबईत भाजप-शिवसेना संघर्ष पेटणार ? आशिष शेलारांनी आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात आखली नवी रणनिती

भाजपने (BJP) संसदीय बोर्डाच्या निवडीसंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी पक्षाचे केंद्रीय संसदीय बोर्ड गठीत केले आहे. जे. पी. नड्डा स्वतः या संसदीय बोर्डाचे अध्यक्ष असतील.

तर अन्य सदस्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, के. लक्ष्मण, इकवाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया, बी.एल. संतोष यांचा समावेश करण्यात आला आहे. बी. एल. संतोष हे केंद्रीय संसदीय बोर्डाचे सचिव असतील.

bjp new parliamentary board nitin gadkari PM modi
भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच चंद्रशेखर बावनकुळेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...,

संसदीय बोर्डाचे सदस्य पुढीलप्रमाणे

जगत प्रकाश नड्डा (अध्यक्ष)

नरेंद्र मोदी

राजनाथ सिंह

अमित शहा

बी. एस. येदियुरप्पा

सर्वानंद सोनोवाल

के. लक्ष्मण

इकबाल सिंह लालपुरा

सुधा यादव

सत्यनारायण जटिया

बी. एल. संतोष (सचिव)

संसदीय बोर्डासह भाजपच्या केंद्रीय निवड समितीची घोषणाही करण्यात आली आहे. या समितीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, ओम माथूर यांना स्थान देण्यात आले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना या समितीतही स्थान मिळालेले नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com