BJP MLA nephew arrested in Ahmedabad hit and run case : गुजरातमध्ये एका हाय-प्रोफाइल हिट-एंड-रन प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. अहमदाबाद ग्रामीण भागात रॅपिडो बाइक-टॅक्सीला एका भरधाव रेंज रोवर कारने जोरदार धडक दिली होती. त्यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या भीषण अपघातातील मुख्य आरोपी राघवेंद्र कुशवाहा या ३५ वर्षीय रियल एस्टेट व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली आहे. पकडलेला हा आरोपी सत्ताधारी भाजपचे बापुनगरमधील आमदार दिनेशसिंह कुशवाहा यांचा पुतण्या असल्याचे समोर आल्याने या प्रकरणाची राज्यभरात जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी दुर्घटना घडवणारी ती बहुमुल्य रेंज रोवर कार देखील जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
आरोपी राघवेंद्र कुशवाह हा बापुनगरचे भाजप आमदार दिनेश सिंह कुशवाह यांचा पुतण्या आहे. त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ११ नोव्हेंबर रोजी शिलाज सर्कलजवळ राघवेंद्रने एका लक्झरी एसयूव्हीने दुचाकीला धडक दिली होती. पोलिसांनी अपघातात सामील असलेली रेंज रोव्हरही जप्त केली आहे.
अहमदाबाद ग्रामीणच्या पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) नीलम गोस्वामी या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यांनी सांगितले की, हा अपघात बोपल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. मृत हर्षदकुमार पुरबिया कामावर जाण्यासाठी घाटलोडिया येथून रॅपिडो राईड बुक केली होती. ते चालक प्रदीप दादवाल यांच्या मागे बसले होते. शिलाज सर्कलजवळ एका एसयूव्हीने त्यांना धडक दिली.
डीएसपी गोस्वामी यांनी सांगितले की, धडक झाल्यानंतर रेंज रोव्हरचा चालक घटनास्थळावरून तात्काळ पळून गेला. रॅपिडोचा चालक प्रदीप दादवाल आणि प्रवासी हर्षद पुरबिया या दोघांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल आणि नंतर सिम्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दुर्दैवाने हर्षद पुरबिया यांचा मृत्यू झाला. या भीषण अपघाताप्रकरणी बोपल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी रेंज रोव्हरमध्ये चार जण होते. तपास पथकाने नोंदणी क्रमांकावरून वाहनाचा माग काढला आणि अहमदाबादचा रहिवासी व रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या कुशवाहाला अटक केली.
डीएसपी गोस्वामी यांनी सांगितले की, अपघात झाला तेव्हा कुशवाहा कलोलमधील मित्राच्या पार्टीतून परत येत होता. अपघात झाला त्यावेळी गाडीत चार जण होते. ते रांचरडा ते शिलाज आणि नंतर तिथे राहणाऱ्या मित्रांना सोडण्यासाठी इस्कॉन प्लॅटिनमला जात होते. मद्यपान करून गाडी चालवण्याच्या शक्यताही वर्तवण्यात येत आहे. पण पोलिसांच्या प्राथमिक तपासात मद्यपानाची पुष्टी झालेली नाही. मात्र आरोपीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.