Gold Rate Today: दिलासादायक बातमी! चांदी १ हजारांनी स्वस्त; सराफा बाजारात सोन्याची किंमत किती? पाहा ताजे दर

Gold Rate Today 14 November 2026 : सोने खरेदी करण्याचा विचार करताय? जळगावमध्ये आज २२ आणि २४ कॅरेट सोन्याचे दर किती आहेत? चांदी किती रुपयांनी स्वस्त झाली? पाहा १४ नोव्हेंबरचे सोने-चांदीचे ताजे भाव.
Gold Rate Today: गुड न्यूज! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले,
Gold-Silver Price TodaySaam tv
Published On: 

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी :

जळगाव सराफ बाजारात आज (ता. १४) सोन्याचे भाव स्थिर राहिले आहेत, तर चांदी एक हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी (ता. ११) सोन्याचा भाव १ लाख ४१ हजार ५०० रुपये (प्रतिदहा ग्रॅम, विनाजीएसटी) होता.

गुरुवारी (ता. १२) बाजार उघडल्यानंतर सोन्याच्या दरात अडीच हजार रुपयांची मोठी घसरण होऊन भाव १ लाख ३९ हजार रुपयांवर आला; तर शुक्रवारी (ता. १३) तो आणखी कमी होऊन १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर पोहोचला. आज (ता. १४) सोन्याच्या भावात कोणताही बदल न होता ते १ लाख ३६ हजार ५०० रुपयांवर स्थिर राहिले आहे.

Gold Rate Today: गुड न्यूज! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले,
PPF Vs SSY: पीपीएफ की सुकन्या योजना, २१ वर्षांत कोणती स्कीम तुम्हाला मालामाल बनवणार? पाहा अचूक आकडा

दुसरीकडे, चांदीच्या दरात घसरण सुरूच आहे. बुधवारी १ लाख ९० हजार रुपये (प्रतिकिलो, विनाजीएसटी) असलेली चांदी गुरुवारी पाच हजारांनी घटून १ लाख ८५ हजारांवर आली होती. काल (ता. १३) चांदी १ लाख ८१ हजारांवर होती, तर आज त्यात आणखी एक हजार रुपयांची घट होऊन भाव १ लाख ८० हजार रुपयांवर खाली आला आहे.

आजचे दर (विनाजीएसटी):

सोने (२४ कॅरेट): १,३६,५०० रुपये (प्रति १० ग्रॅम)

सोने (२२ कॅरेट): १,२५,०३५ रुपये (प्रति १० ग्रॅम)

चांदी: १,८०,००० रुपये (प्रति १ किलो)

Gold Rate Today: गुड न्यूज! सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले,
मराठवाड्याची चिंता वाढली! अवघ्या अडीच महिन्यांत जायकवाडीतील पाणी ९५ वरून थेट ६९ टक्क्यांवर; नेमकं कारण काय?

काही दिवसांतील सोन्याचे भाव (विनाजीएसटी)

८ नोव्‍हेंबर - १ लाख ४२ हजार

९ नोव्‍हेंबर - १ लाख ४३ हजार ५००

१० नोव्‍हेंबर- १ लाख ४२ हजार ८००

११ नोव्‍हेंबर -१ लाख ४१ हजार ५००

१२ नोव्‍हेंबर- १ लाख ३९ हजार

१३ नोव्हेंबर १ लाख ३६ हजार ५०० रुपये

१४ नोव्हेंबर १ लाख ३६ हजार ५०० रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.