BJP MLA Harish Khurana
BJP MLA Harish KhuranaSaam Tv News

भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

BJP MLA Harish Khurana: भाजप आमदार हरीश खुराणा यांच्यावर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ल्याचा आरोप. घटना दिल्लीतील मोती नगर येथील आचार्य श्री भिक्षू रुग्णालयात घडली.
Published on
Summary
  • भाजप आमदार हरीश खुराणा यांच्यावर प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ल्याचा आरोप.

  • घटना दिल्लीतील मोती नगर येथील आचार्य श्री भिक्षू रुग्णालयात घडली.

  • रेसिडेंट डॉक्टर संघटनांनी एफआयआर आणि सुरक्षा वाढवण्याची मागणी केली.

  • आप पक्षाने दिल्ली पोलिसांवर भाजप आमदाराला वाचवण्याचा आरोप केला.

भाजप आमदार हरीश खुराना यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील मोती नगर येथील आचार्य श्री भिक्षू रूग्णालयात आपत्कालीन ड्युटीवर तैनात असलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर हल्ला झाल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली. डॉक्टरने रूग्णालय प्रशासनाकडे याबाबत तक्रार दाखल केली. हरीश खुराना आणि त्यांच्या समर्थकांवर डॉक्टरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे.

फेडरेशन ऑफ ऑल इंडिया रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन, AIIMS रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशन आणि लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजच्या आरडीए यांनीही या प्रकरणात कायदेशीर कारवाई करण्याची आणि रूग्णालयात सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे.

BJP MLA Harish Khurana
खड्ड्यांमुळे डॉक्टरचा मृत्यू; स्कूटीसह खाली पडले, ट्रकनं चिरडलं, नेमकं घडलं काय?

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 'सकाळी ११: १५ च्या सुमारास, चार ते पाच लोक १० वर्षांच्या मुलाला दवाखान्यात घेऊन आले. ते थेट आपत्कालीन कक्षात आले होते. त्या मुलाच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्यांनी जलद उपचारांसाठी दबाव आणण्यास सुरूवात केली. प्रशिक्षणार्थी डॉक्टर आणि इतर निवासी डॉक्टर दुसऱ्या रूग्णाला चेक करत होते. म्हणून त्यांना थोडावेळ थांबण्यास सांगितले'.

BJP MLA Harish Khurana
देहविक्रीचं मोठं रॅकेट, तरुणींचे फोटो पाठवायचे, १००० रुपये घेऊन घरीच....; आई-मुलाचा खरा चेहरा उघड

'त्यावेळी त्या लोकांनी गैरवर्तन करण्यास सुरूवात केली', अशी माहिती प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी दिली. या हल्ल्यात भाजप आमदार हरीश खुराना यांचा सहभाग असल्याची चर्चा आहे. भाजप आमदाराद्वारे आचार्य भिक्षू सरकारी रूग्णालयात डॉक्टरवर हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याची मागणी करण्यात येत आहे.

BJP MLA Harish Khurana
मुंबई - कोल्हापूर, कोल्हापूर- तिरूपती प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; रेल्वेत मोठे बदल

या घटनेनंतर आप पक्षाचे दिल्ली राज्य संयोजक सौरभ भारद्वाज यांनी आरोप केला की, भाजप आमदाराने बुधवारी डॉक्टरवर हल्ला केला होता. परंतु दिल्ली पोलीस गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ करीत होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com